SBI Bharati 2024 शासकीय बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आंनंदाची बातमी आहे. भारतातल्या सर्वात मोठया बँकेत काम करण्याची संधी तरूणांना उपलब्ध झाली आहे. कारण SBI ने १०४० पदांची महाभरती प्रक्रिया राबवण्याचे जाहीर केले आहे. सदर पदांकरीता आवश्यक पात्रता काय ऑनलाईन पध्दतीने अर्ज कसा करावा, पदांची संख्या, पदनाम या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहिरात आपण या लेखात पाहुया. sbi recruitment 2024
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
०१. | सेंट्रल रिसर्च टीम | ०२ |
०२. | सेंट्रल रिसर्च टीम | ०२ |
०३. | प्रकल्प विकास व्यवस्थापक | ०१ |
०४. | प्रकल्प विकास व्यवस्थापक(व्यवसाय) | ०२ |
०५. | रिलेशनशिप व्यवस्थापक | २७३ |
०६. | VP वेल्थ + | ६४३ |
०७. | रिलेशनशिप मॅनेजर (टिम लिड) | ३२ |
०८. | विभागीय हेड | ०६ |
०९. | इन्वेस्टमेंट स्पेशालिस्ट | ३० |
१०. | गुंतवणुक अधिकारी | ४९ |
एकुण पदांची संख्या | १०४० |
आवश्यक शैक्षणिक पात्रता (Education Qualification)-
- पद क्र. ०१.साठी MBA/ PGDM/ PGDBM/ CA/CFA
- पद क्र, ०२.साठी पदवी पदव्युत्तर पदवी (वाणिज्य वित्त अर्थशास्त्र व्यवस्थापन गणित सांख्यिकी)
- पद क्र.०३. साठी MBA/MMS/ME/PGDM/M.TECH/BE/B.TECH/PGDBM
- पद.क, ०४ साठी MBA/PGDM/PGDBM
- पद. क्र.०५ ते ०८ साठी कोणत्याही शाखेतील पदवीधर
- पद. क्र.०९ व १० साठी MBA/PGDM/PGDM/CFA/CA, NISM 21 A प्रमाणपत्र
परीक्षा शुल्क किती असेल
सदर पदभरती प्रकिया करीता जनरल आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांकरीता ७५० रु. तर SC, OBC,ST,PWD प्रवर्गा करीता परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही. भरतीसंबंधी अधिक माहिती करीता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावी. sbi recruitment 2024
येथे करा अर्ज
जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज हे https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-09/apply या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक हे.
अर्ज करण्याची अंतीम तारीख
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज दिनांक ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत भरायचे आहेत. कारण ही अंतीम तारीख असून त्यानंतर भरण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण घाई केली पाहिजे. आणि लवकरात लवकर या संधीचे सोने केले पाहिजे. sbi recruitment 2024
SBI मधील नोकरीचा फायदा
स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेत नोकरी करणाऱ्या अधिकारी वर्गास राहण्यास उत्तम घर दिले जाते. तसेच कर्मचारी वर्गास कमी व्याजदरात कर्ज देखील उपलब्ध करुन दिले जाते. पगारासह इतर भत्ते देखील नोकरीमध्ये दिले जातात. त्यामुळे अनेकजण एसबीआय मधील भरतीचत्या जाहिरातीची वाट पाहत असतात. तुम्हाला ही संधी मिळाली आहे तर तुम्ही ती गमाऊ नका. आजच वर दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा आणि परीक्षेच्या तयारीस सुरुवात करा. परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत असते. त्यानंतरच उमेदवाराची अंतिम निवड केली जाते. त्यासाठी तुम्ही योग्य ती तयारी करण्यास सुरुवात करा. sbi recruitment 2024
स्टेट बँक ऑफ इंडियासंबंधित माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियासंबंधीत परीक्षा देण्यासाठी या बँकेबद्दल माहिती मिळवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये भारताचे बंगाल, मद्रास आणि बॉम्बे अशा तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. या तिन्हीही प्रांतांमध्ये ब्रिटीशांद्वारे बॅंक ऑफ बंगाल, बॅंक ऑफ मद्रास आणि बॅंक ऑफ बॉम्बे या बँकांची स्थापना करण्यात आली होती. पुढे १९२१ मध्ये या तिन्ही बॅंकाचे एकीकरण करुन इंपीरियल बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली. देशाला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर जुलै १९५५ मध्ये इंपीरियल बॅंक ऑफ इंडिया चे नाव बदलुन स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवले गेले. या बॅंकाचे मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे. sbi recruitment 2024