द्रौपदी मुर्म यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड (१६वी राष्ट्रपती निवडणूक)
👩🦰 तया भारताच्या दुसऱ्या महिला तर आतापर्यंतच्या १ल्या आदिवासी राष्ट्रपती ठरल्या
⏳ यापूर्वी प्रतिभाताई पाटील यांनी भारताच्या १ल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्य केले
📝 दरौपदी मुर्मु भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची जागा घेणार आहेत
⭐️ रामनाथ कोविंद यांनी २०१७ ते २०२२ दरम्यान १४वे राष्ट्रपती म्हणून कार्य केले
🇮🇳 भारतीय राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ ०५ वर्ष असतो (पुर्ननियुक्तीस पात्र असतात)
⭐️ आतापर्यंत फक्त डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीच ०२ वेळा राष्ट्रपती पद भूषविले (१९५०-६२)
- 🗳️ राष्ट्रपती निवडणूकीसाठी खासदारांना हिरव्या तर आमदारांना गुलाबी रंगाच्या मतपत्रिका
द्रौपदी मुर्मू
ही कहाणी आहे एका शिक्षिकेची, ही कहाणी आहे एका झुंजार आदिवासी महिलेची, ही कहाणी आहे एका निस्वार्थी समाजसेविकेची, ही कहाणी आहे एका अध्यात्मिक प्रवासाची, ही कहाणी आहे एका जिद्दी समर्पित जीवनाची, ही कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची.
काल-परवा पर्यंत फारसे कोणाला माहीत नसलेले द्रौपदी मुर्मू यांचे नाव आज खूपच चर्चेत आहे. राष्ट्रपतीपदाची त्यांची ऊमेदवारी घोषित होईपर्यंत तसे त्यांचे नाव अज्ञात होते. एका आदिवासी, गरीब, सामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदाची ऊमेदवारी मिळते, हीच मुळी आपल्या शक्तीशाली लोकशाहीची थक्क करणारी सुंदर साक्ष आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या ऊमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे.विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्म यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रेरणादायीही आहे. घराणेशाही,अमर्याद संपत्ती आणि खानदानाचा दर्प नसलेल्या सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशीच कहाणी ही द्रौपदी मुर्मू यांची आहे.
ओरीसा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला. १९७९ साली त्या पदवीधर झाल्या. ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यात कारकून झाल्या. पुढे त्या शिक्षक झाल्या. नेगरसेवक झाल्या. आमदार झाल्या. मंत्री झाल्या, राज्यपाल झाल्या. आणि आता राष्ट्रपतीदाच्या ऊमेदवार. घराणेशाही नाही,संपत्ती नाही,वारसा नाही. सारेच कसे थक्क कणारे आहे. त्यांच्या पतीचे नाव शाम चरण मुर्मू आहे.
आजही त्या मयुरभंज येथे एका साध्या दुमजली घरात राहतात. ६४ वर्षाच्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. दलित, आदीवासी, लहान मुले यांच्या ऊत्थापनासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली. कोणीही कोलमडले असते. त्याही कोलमडल्या. पण पुन्हा ऊभ्या राहिल्या. ताठ ऊभ्या राहिल्या. त्यांना दोन मुले व एक मुलगी. २००९ साली २५ वर्षाचा मुलगा मरण पावला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्या डिप्रेशन मध्ये गेल्या. जीवनातील सारे स्वारस्य निघून गेले.खचुन गेल्या. याचवेळी त्या प्रजापिता ब्रम्हकुमारी या अध्यात्मिक संस्थानात गेल्या. त्या अध्यात्माला शरण गेल्या. त्या पुन्हा ऊभ्या राहतात तोच दुसरा मुलगा २०१३ साली रस्ता अपघातात गेला. त्याच महिन्यात आई गेली, कर्तबगार भाऊही गेला. चार वर्षात जवळची सगळी माणसे हरवली. आणि २०१४ साली पती शाम चरण मुर्मूही गेले. त्या एकाकी झाल्या. नियतीने त्यांच्यावर घोर अन्याय केला.
परंतु अध्यात्म त्यांच्या सोबत होते. त्यांनी दलित, आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. स्वतःचे दुःख जगाच्या दुखात मिसळून टाकले. पुन्हा ताठपणे ऊभ्या राहिल्या. २०१५ साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. लवकरच विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला.२०२१ पर्यंत त्या राज्यपाल होत्या.
२० जून रोजी त्यांचा वाढदिवस होता. आणि २१ जून भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांना हा आनंदाचा धक्का होता आणि देशालाही. त्या नेहमी प्रमाणे शिवमंदीरात गेल्या. स्वतः झाडू घेऊन मंदीर स्वच्छ केले. मंदीरातील कर्मचाऱ्याबरोबर सुखसंवाद केला. मयुरभंजमध्ये जल्लोष झाला. द्रौपदी मुर्मू या एका लहानशा घरातून ३५० एकर परिसर,१९० एकर बगीचा व ७५० कर्मचारी असलेल्या प्रशस्त राष्ट्रपतीभवनात लवकरच जातील. एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होईल. हे भारतीय लोकशाहीचे केवढे नितांत सुंदर व विलोभनीय रुप आहे बरे!
आतापर्यंतचे राष्ट्रपति
# | नाव | चित्र | पदग्रहण | पद सोडले | उप-राष्ट्रपती | टीपा |
१ | डॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३) | २६ जानेवारी १९५० | १३ मे १९६२ | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन | बिहार राज्याचे रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.[४][५] ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.[६] | |
२ | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) | १३ मे १९६२ | १३ मे १९६७ | डॉ. झाकिर हुसेन | डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्त्ववेत्ते होते. | |
3 | झाकिर हुसेन (१८९७-१९६९) | [ चित्र हवे ] | १३ मे १९६७ | ३ मे १९६९ | वराहगिरी वेंकट गिरी | डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभूषण व भारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते. |
वराहगिरी वेंकट गिरी * (१८९४-१९८०) | [ चित्र हवे ] | ३ मे १९६९ | २० जुलै १९६९ | |||
मोहम्मद हिदायतुल्ला * (१९०५-१९९२) | [ चित्र हवे ] | २० जुलै १९६९ | २४ ऑगस्ट १९६९ | राष्ट्रपती होण्यापूर्वी हिदायतुल्ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. | ||
४ | वराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) | २४ ऑगस्ट १९६९ | २४ ऑगस्ट १९७४ | गोपाल स्वरूप पाठक | कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत. | |
5 | फक्रुद्दीन अली अहमद (१९०५-१९७७) | 100 px | २४ ऑगस्ट १९७४ | ११ फेब्रुवारी १९७७ | बी.डी. जत्ती | |
बी.डी. जत्ती * (१९१२-२००२) | [ चित्र हवे ] | ११ फेब्रुवारी १९७७ | २५ जुलै १९७७ | |||
६ | नीलम संजीव रेड्डी (१९१३-१९९६) | २५ जुलै १९७७ | २५ जुलै १९८२ | मोहम्मद हिदायतुल्ला | ||
७ | झैल सिंग (१९१६-१९९४) | २५ जुलै १९८२ | २५ जुलै १९८७ | रामस्वामी वेंकटरमण | १९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते. | |
८ | रामस्वामी वेंकटरमण (१९१०-२००९) | २५ जुलै १९८७ | २५ जुलै १९९२ | शंकरदयाळ शर्मा | वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता. | |
९ | शंकरदयाळ शर्मा (१९१८-१९९९) | २५ जुलै १९९२ | २५ जुलै १९९७ | के.आर. नारायणन | ृराष्ट्रपती होण्यापूर्वी शर्मा हे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. | |
१० | के.आर. नारायणन (१९२०-२००५) | २५ जुलै १९९७ | २५ जुलै २००२ | कृष्णकांत | ||
११ | डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (जन्म १९३१) | २५ जुलै २००२ | २५ जुलै २००७ | भैरोसिंग शेखावत | अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती.[७] त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.[८][९][१०] | |
१२ | प्रतिभा पाटील (जन्म १९३४) | २५ जुलै २००७ | २५ जुलै २०१२ | मोहम्मद हमीद अन्सारी | राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या. | |
१३ | प्रणव मुखर्जी (जन्म १९३५) | २५ जुलै २०१२ | २५ जुलै २०१७ | मोहम्मद हमीद अन्सारी | मुखर्जी मनमोहनसिंग सरकारमध्ये अर्थमंत्री होते. | |
१४ | रामनाथ कोविंद | २५ जुलै २०१७ | विद्यमान | व्यंकय्या नायडू | २०१५ ते २०१७ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.२५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. रामनाथ कोविन्द याचं जन्म उत्तर प्रदेश येतील कानपुर जिल्हयात डेरापुर, कानपुर या एका छोट्याशा गावात झाला. |
राष्ट्रपती संबंदधी कलमे
कलम | वर्णन |
कलम 52 | भारताचे राष्ट्रपती |
कलम 53 | संघाची कार्यकारी शक्ती |
कलम 54 | राष्ट्रपतींची निवडणूक |
कलम 55 | राष्ट्रपती निवडीची पद्धत |
कलम 56 | राष्ट्रपती पदाची मुदत |
कलम 57 | राष्ट्रपती आपले कालावधी पूर्ण केल्यानंतर परत निवडून येण्यास पात्र असेल |
कलम 58 | राष्ट्रपती बनण्यासाठी पात्रता |
कलम 59 | राष्ट्रपतीच्या काही अटी |
कलम 60 | राष्ट्रपतीची शपथविधी |
कलम 61 | राष्ट्रपतीची महाभियोग प्रक्रिया |
कलम 62 | अध्यक्ष पदाची रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ आणि आकस्मिक रिक्त जागा भरण्यासाठी निवडलेल्या पदाचा कालावधी किंवा व्यक्ती |
कलम 70 | इतर आकस्मिक स्थितीत राष्ट्रपतींची कार्ये पार पाडणे |
कलम 71 | अध्यक्ष किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडीशी संबंधित किंवा त्याच्याशी संबंधित बाबी |
कलम 72 | क्षमा वगैरे मंजूर करण्याची आणि काही प्रकरणांमध्ये शिक्षा स्थगित करण्याची, पाठवण्याची किंवा बदलण्याची राष्ट्रपतीची शक्ती |
कलम 74 | राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ |
कलम 75 | मंत्र्यांसाठी इतर तरतुदी |
कलम 87 | राष्ट्रपतींचे विशेष भाषण |
कलम 123 | संसदेच्या सुट्टीत अध्यादेश जारी करण्याची राष्ट्रपतीची शक्ती |
कलम 143 | सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याची राष्ट्रपतीची शक्ती |
कलम 352 | राष्ट्रीय आणीबाणी |
कलम 356 | राष्ट्रपती राजवट |
कलम 360 | आर्थिक आणीबाणी |