शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी ! आता ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी शासनाकडून मिळणार अनुदान, किती अनुदान मिळणार ?

शेतकरी बंधूंनो कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध कृषी यंत्रांसाठी शेतकरी बांधवांना अनुदान पुरवले जात आहे. तरी दरम्यान याच योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे की , आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे ..

२०२३पासून ट्रॉलीसाठी अनुदान दिले जाणार असल्याची माहिती एका रिपोर्ट मधून समोर आली आहे. दरम्यान आज आपण ट्रॉलीच्या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र राहणार आणि यासाठी किती टक्के अनुदान मिळणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया

या शेतकरी बांधवांना मिळणार अनुदान ?

कृषी यांत्रिकीकरणं योजनेअंतर्गत २०२३ वर्षा पासून राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉली साठी अनुदान पुरवले जाणार आहे . यासाठी वैयक्तिकरित्या शेतकरी, महिला शेतकरी अर्ज करू शकतात . तसेच शेतकरी समूह गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थाही अर्ज करू शकणार आहेत.

अनुदान किती मिळणार ?

ट्रॉलीसाठी 45 ते 50 टक्के एवढे अनुदान पुरवले जाणार आहे. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 45% टक्के एवढ अनुदान दिले जाणार आहे. तर अनुसूचित जाती, जमाती व इतर, अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे

अर्ज कुठे वर कसा करावा लागणार ?

महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत विविध गट अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी ४५ ते ५०% टक्के अनुदान देण्यात येत असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना ट्रॉलीच्या अनुदानासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावा लागणार आहे .

Leave a Comment