ICC World Cup 2023 : मित्रांनो या वर्षी विश्वचषकाच्या आपल्या देशात होनार आहे ते सर्वांना माहीत आहेत पण तुम्हाला माहीत आहे का सामन्याची तिकिटे खरेड कधी पासुन होणार आहे तर चला मग जाणून घेऊ या
तिकिट विक्रीची अधिकृत तारीख जाहीर; पुण्याच्या मैदानाची तिकिटे 31 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्धएमपीसी न्यूज – 2023 चा एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक यंदा (ICC World Cup) भारतामध्ये होत आहे. भारत हा एक क्रिकेट वेडा देश असून विश्वचषकाला घेऊन प्रत्येक वेळी उत्सुकता असतेच. परंतु या यंदाचा विश्वचषक स्वतःच्या देशात होत असल्याने यावर्षी प्रेक्षकांची उत्सुकता जास्तच दिसून येत आहे.विश्वचषक हा भारताच्या 11 शहरांमध्ये होणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने गुरुवारी (दि 10) तिकीट विक्रीची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. 25 ऑगस्ट पासून भारतीय संघाचा सहभाग नसलेल्या सामन्यांची तिकिटे उपलब्ध असणार आहेत तर भारतीय संघाचा सहभाग नसलेल्या सराव सामन्यांची सुद्धा तिकिटे मिळणार आहेत.30 ऑगस्ट पासून गुवाहाटी आणि त्रिवेंद्रम मध्ये होणाऱ्या भारताच्या सामन्यांची तिकिटे मिळणार आहेत. याचप्रमाणे चेन्नई, दिल्ली आणि पुणे या शहरांमध्ये होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांची तिकिटे ही 31 ऑगस्ट पासून मिळणार आहेत.
1 सप्टेंबर पासून धर्मशाळा, लखनऊ आणि मुंबई या शहरांच्या (ICC World Cup) सामन्यांची तिकीट मिळणार आहेत तर 2 सप्टेंबर पासून बेंगळुरू आणि कोलकाता या शहरांमध्ये होणाऱ्या सामन्यांची तिकिटे मिळणार आहे. 3 सप्टेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादची तिकिटे उपलब्ध होणार आहेत. तरी मित्रांनो ही माहिती सर्व क्रिकेप्रेमींना शेअर करा