घर बांधण्यासाठी बँक देणार 50 लाखांचे कर्ज home loan मिळणार

शेतकऱ्यांसाठी खुशखबर  बँक ऑफ इंडियाने देशातील शेतकऱ्यांसाठी “स्टार किसान घर योजना” या नावाने अत्यंत फायदेशीर home loan कर्ज योजना सुरू केली आहे. आपण सर्वाना माहीत आहे की शेतकऱ्याची परिस्तिती कसे असते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याज दरात घर किंवा फार्म हाऊस बांधण्यासाठी बँकेकडून गृहकर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आह.  जेणेकरून आर्थिकदृष्ट्या दुर्बल उत्पन्न गटातील ज्या शेतकऱ्यांकडे घर बांधण्या साठी कोणतीही ठेव भांडवल नाही आणि स्वतःचे घर नसल्यामुळे त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत आपले जीवन जगावे लागत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना आता स्टार किसान घर ही योजना लाभदायी ठरेल

स्टार किसान घर” योजनेतून  घर बांधण्यासाठी 50 लाखांचे कर्ज मिळणार

स्टार किसान घर योजना ही देशातील सरकारी बँकांपैकी एक असलेल्या BOI शेतकऱ्यांना Home Loan. गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खास केली आहे, ज्याद्वारे बँक शेतकऱ्यांना त्यांचे नवीन घर बांधण्यासाठी ते दुरूस्त करण्यासाठी  कर्ज उपलब्ध करून देते. 1 लाख ते  50 लाख रुपयां पर्यंत कर्ज मिळू शकते ,कर्ज मिळण्याचा लाभ 8.05 टक्के व्याज दराने दिला जातो,  या योजनेचा लाभ फक्त देशातील बँक ऑफ इंडिया मध्ये KCC खाते असलेल्या कृषी कार्यात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल. ज्यासाठी शेतकऱ्यांना बँक ऑफ इंडियाच्या www.bankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी .

स्टार किसान घर योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत

  1.  या योजनेअंतरंगत  शेतकऱ्यांना त्यांचे नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या   घर दुरुस्त करण्यासाठी  8.05% व्याजदराने 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकेल.
  2. . या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १५ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज मिळू शकेल.
  3. . शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर फार्म हाऊसचे बांधकाम ही करता येणार आहे.
  4. . स्टार किसान घर योजनेचा लाभ बँक ऑफ इंडिया  मध्ये KCC खाते असलेल्या शेतीशी संबंधित शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.
  5. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना IT रिटर्न सादर करण्याची आवश्यकता नाही.

योजने साठी   अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. शेतकऱ्याचे आधार कार्ड
  2. ओळखपत्र
  3. निवास प्रमाणपत्र
  4. KCC बँक खाते पासबुक
  5. शेतजमिनीची कागदपत्रे
  6. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  7. मोबाईल नंबर

स्टार किसान घर योजनेसाठी  अर्ज कसा करावा

स्टार किसान घर Home Loan योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, अर्जदार शेतकरी ऑफलाइन बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करून येथे नमूद केलेली प्रक्रिया वाचून अर्ज पूर्ण करू शकतात.

  • यासाठी अर्जदारांनी प्रथम BOI च्या अधिकृत वेबसाइट www.bankofindia.co.in ला भेट द्यावी.
  • आता होम पेजवर स्टार किसान घर योजनेची लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • आता अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्जाची PDF तुमच्या समोर उघडेल.
  • आता फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
  • यानंतर, फॉर्ममध्ये विचारलेली माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा आणि बँकेच्या शाखेत जमा करा..

 कृपया ही माहिती शेतकाऱ्या पर्यन्त पोहचवा .

Leave a Comment