Chief Minister Vayoshree Yojana वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना वयाच्या अखेरीस बरीचशी कामे जमत नाहीत, त्यामुळे त्यांना आर्थिक हातभारत लाभावा यासाठी महाराष्ट्र शासनाने एक योजना जाहीर केली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024. महाराष्ट्र समाज कल्याण विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभा घ्यावा. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार दिव्यंगत्व, अशक्तपणा, ऐकू कमी येणे अशा आव्हानांना तोंड द्यावे लागते, त्यासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी व मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत आहे.
ज्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. यात पात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न वैयक्तिक बँक खात्यावर एकरकमी 3000/- रुपये थेट लाभ वितरण देण्यात येणार आहे. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून अधिक माहिती मिळवूया या योजनेबद्दल. Mukhyamantri Vayoshri Yojana.
काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे की वय 65 वर्षांपेक्षा अधिक असेल, अशा नागरिकांसाठी आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी व आवश्यक साह्य साधने व उपकरणे खरेदीसाठी देण्याकरिता राज्य शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जाते. Mukhyamantri Vayoshri Yojana.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे निकष काय आहेत?
- अर्जदारांनी 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असावी.
- अर्जदाराकडे योजनेसाठी आवश्यक सर्व अधिकृत कागदपत्रे असणे आवश्यक कागदपत्रे असायला हवीत.
- अर्जदाराने या प्रकारच्या केंद्रिय किंवा राज्य पातळीवरील संबंधीत योजनेचा लाभ घेतलेला नसावा. Mukhyamantri Vayoshri Yojana.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठांना मिळतात हे लाभ
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्याला चष्मा, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, सर्वाइकल कॉलर, कंबर बेल्ट,नि-ब्रेस व मानेचा बेल्ट यांसारख्या आवश्यक साह्य साधनांसाठी व उपकरणांसाठी राज्य साह्य साधनांसाठी व उपकरणांसाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे 3000/-रुपये पर्यंत ची आर्थिक मदत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. Chief Minister Vayoshree Yojana
वयोश्री योजनेसाठीचे आवश्यक कागदपत्रे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- आधार संलग्न राष्ट्रीय बँकेचे पासबुक
- शासनातर्फे देण्यात आलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
- दोन पासपोर्ट साईज फोटो Mukhyamantri Vayoshri Yojana.
मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत मिळणारे उपकरणे
योजने द्वारे दिली जाणारी 3000/- रुपयांची आर्थिक मदत हि वृद्धांना उपकरणे खरेदी करण्यासाठी असणार आहे, पैसे DBT द्वारे थेट लाभार्थी जेष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. पुढील सर्व उपकरणासाठी येणारा सर्व खर्च पूर्णपणे राज्य सरकार भरणार आहे. Chief Minister Vayoshree Yojana
- श्रवणयंत्र
- फोल्डिंग वॉकर
- बॅक सपोर्ट बेल्ट
- व्हील चेयर
- सर्वाइकल कॉलर
- चष्मा
- ट्रायपॉड
- स्टिक व्हीलचेयर
- कमोड खुर्ची
- नि-ब्रेस लंबर बेल्ट
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्जदाराची पात्रता
महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास आधी तुम्ही या योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. पुढील पात्रतेनुसार तुम्ही योजनेचे लाभार्थी बनू शकता.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- आर्जदार ज्येष्ठ नागरिकाचे वय हे किमान 65 वर्षे असावे.
- आर्जदार ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखा पेक्षा कमी असावे.
वरील पात्रता निकषांची जे अर्जदार पूर्तता करतील, त्यांनाच मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये सहभागी होता येईल. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे. Chief Minister Vayoshree Yojana
मुख्यमंत्री वयोश्री योजना निधी वितरण
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेद्वारे शासन निर्णयात जाहिर केल्यानुसार आर्थिक मदत केली जाणार आहे. ही आर्थिक मदत थेट बँकेत जमा केले जाणार आहेत.
- थेट वितरण प्रणाली द्वारे रु. 3000/- च्या मर्यादेत निधी वितरण.
- राज्य शासनाद्वारे वृद्धांना उपकरणे खरेदी करण्यासाठी १००% पर्यंत अर्थसहाय्य. Chief Minister Vayoshree Yojana