SSC JE Bharti 2024: बरेचदा असे ऐकायला मिळते की इंजिनिअरींग करुन बेरोजगार आहे. परंतू आता बेरोजगार इंजिनिअर्ससाठी एक उत्तम संधी शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत ज्युनिअर इंजिनिअर पदासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्यूनिअर इंजिनिअरिंग पदासाठी Civil, Mechanical, Electrical, Electrical & Mechanical यापैकी कोणत्याही क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा प्रमामपत्र धारकांसाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. तुम्ही देखील वरीलपैकी कोणत्याही एका क्षेत्रातील इंजिनिअरींग केली असेल तर आजच स्टाफ सिलेक्शन कमीशन च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा.
किती जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे?
968 जागांसाठी staff selection commission अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी जाहीर करण्यात आली असून खालील प्रमाणे जी पदे रिक्त आहेत आणि त्यांच्या किती जागा रिक्त आहेत ही संख्या देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अर्जदाराने त्याच्या इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्या त्या पदासाठी अर्ज करावा. SSC JE Bharti 2024
- ज्युनियर इंजिनिअर Civil विभागात 788 जागा भरण्यात येणार आहेत
- ज्युनियर इंजिनिअर Mechanical विभागात 15 जागा भरण्यात येणाऱ आहेत
- ज्युनियर इंजिनिअर Electrical विभागात 128 जागा भरण्यात येणार आहेत
- ज्युनियर इंजिनिअर Electrical & Mechanical विभागात 37 जागा भरण्यात येणार आहेत
अशा एकूण 968 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
कर्मचारी चयन आयोग म्हणजेच staff selection commission अंतर्गत ज्यूनिअरल इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील इंजिनिअरिंग मधिली विविध क्षेत्रातील पदवी किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. SSC JE Bharti 2024
- Civil, Mechanical, Electrical, Electrical & Mechanical संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र
परीक्षा शुल्क किती असेल
- जनरल आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 100/- रु असणार आहे.
- SC/ST/PWD आणि महिला, माजी सैनिक यांच्यासाठी कोणतीही परीक्षा शुल्क असणार नाही.
वेतन किती असेल?
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ज्युनिअरल इंजिनिअर पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यास 35400/- ते 112400/- रुपये इतके वेतन असेल. SSC JE Bharti 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशनची अधिकृत वेबसाईट
कर्मचारी चयन आयोग म्हणजेच staff selection commission ही संस्था शासकीय असून संपूर्ण भारतात विविध स्थरावरील अधिकारी आणि कर्मचारी पुरविण्याचे काम करते. https://ssc.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
येथे जाहिरात पहा
स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत ज्यूनिअर इंजिनिअर पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या भरतीची जाहिरात तुम्ही पुढील लिंकवर क्लि करुन पाहू शकता. https://drive.google.com/file/d/1WHCJy3J4vPlDTbcQ7XWzfav2v-E4Z6R4/view या लिंकवर क्लिक करुन तुम्ही भरती संबंधीत अधिक माहिती मिळवू शकता. SSC JE Bharti 2024
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी
- तुम्ही Civil, Mechanical, Electrical, Electrical & Mechanical यापैकी कोणत्याही क्षेत्रातील इंजिनिअरिंग पदवी प्राप्त उमेदवार असाल तर आजच https://ssc.gov.in/home/apply या लिंकवर क्लिक करा. आणि तुमचे आवेदन पत्र भरा.
- स्टाफ सिलेक्शन कमिशन हे भारतीय शासनांतर्गत येणारा विभाग असून त्यामध्ये कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देखील मिळतात. शासकीय नोकरी करण्याची संधी मिळते, तुम्ही वरील लिंकवर क्लिक करुन अप्लाय करु शकता.
- अप्लाय करताना तुमची शैक्षणिक कागदपत्रे जोडा. योग्य आवश्यक कागदपत्रे नीट अपलोड करा.
- तुमचा संपर्क क्रमांक आणि ईमेलआयडी काळजीपूर्वक भरा. जेणेकरुन स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून परीक्षे संबंधीत माहिती देण्यासाठी तुमचा ईमेल आयडी वापरात आणला जातो. त्या माध्यमातूनच उमेदवारांना सुचना दिल्या जातात. SSC JE Bharti 2024
- तुमचे नवीन काढलेले पासपोर्ट आकाराचे फोटो देखील अपलोड करा, तुमची स्वाक्षरी डिजिटल स्वरुपात अपलोड करायला विसरू नका.
- भरलेली माहिती सबमीट करण्याआधी पुन्हा एकदा तपासून पहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
तुम्ही Civil, Mechanical, Electrical, Electrical & Mechanical यापैकी कोणत्याही क्षेत्रातील इंजिनिअरिंग पदवी प्राप्त उमेदवार असाल तर या संधीचा जरूर लाभ घ्या. त्यासाठी वरील माहितीनुसार दिनांक 18 एप्रिल 2024 च्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. जेणेकरुन तुम्ही या संधीसाठी पात्र ठराल. SSC JE Bharti 2024