MSCE Pune Recruitment 2024: तुमच्या कडे टंकलेखन प्रमाणपत्र आहे आणि तुम्ही टंकलेखना संबंधीत नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पुणे येथे मुख्य कार्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक या तीन शासकीय पदांसाठी तब्बल 23 जागांवर पदभरती जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तालयामधील राज्यस्तरावरील कार्यालयातील पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार ही भरजी जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पुणे शहरात होणार असून इच्छूकांनी लवकरात लवकर परीक्षेचा फॉर्म भरावा. ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षे बाहेरी असून गट-क वर्गातील ही पदभरती होत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील उपलब्ध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. भरतीसंबंधीत सर्व माहिती लेखात सविस्तरपणे दिलेली आहे. लेख पूर्ण वाचा आणि आजच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. MSCE Pune Recruitment 2024
कोणकोणत्या पदासाठी जाहीरात करण्यात आली आहे?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अंतर्गत भरतीमध्ये खालील पदांसाठी जाहीरात काढण्यात आली आहे.
- मुख्य लिपिक 6 रिक्त पदे
- वरिष्ठ लिपिक 14 रिक्त पदे
- निम्नश्रेणी लघुलेखक 3 रिक्त पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
मुख्य लिपिक आणि वरिष्ट लिपिक पदासाठी आवश्यक शिक्षण
- अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा MSCE Pune Recruitment 2024
- अरजदार संगणक टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा
- अर्जदार मुख्य लिपिक पदासाठी अर्ज करणार असल्यास त्याला किमान दोन वर्षाचा शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव असणे आवश्यक.
- एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक MSCE Pune Recruitment 2024
निम्नश्रेणी लघुलेखक पदासाठी आवश्यक शिक्षण
- अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला, वाणिज्य, विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा
- अर्जदार संगणक टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. चे शासनामार्फत झालेल्या परीक्षेचे वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक.
- अर्जदार एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण असावा. MSCE Pune Recruitment 2024
परीक्षा शुल्क किती असेल?
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 950/- रु परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, मागासवर्गीय , दिव्यांग, अनाथ उमेदवारांना 850/- रु परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. MSCE Pune Recruitment 2024
अर्जदाराची वयोमर्यादा किती आहे?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अंतर्गत भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही 18 वर्षे पूर्ण ते 38 वर्षे इतकी असणार आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना
नोकरीचे ठिकाण कुठे असेल?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे मुख्य कार्यालय पुणे शहरात असल्याने नोकरीचे ठिकाण देखील पुणे हे असणार आहे. MSCE Pune Recruitment 2024
पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिकृत वेबसाईट
https://www.mscepune.in/ ही पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची अधिकृत वेबसाईट असून तुम्ही या लिंकवर क्लिक करुन वेबसाईटला भेट देऊ शकता. संस्थेसंबंधीत अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला या लिंकचा फायदा होईल.
भरती संबंधित जाहिरात
https://www.mscepune.in/gcc/path/LipikJahirat.pdf या लिंकवर क्लिक करुन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अंतर्गत जाहीर झालेल्या भरतीची जाहिरात पाहू शकता. ही जाहीरात PDF स्वरुपात असून तुम्ही त्याची प्रिंट देखील घेऊ शकता.
भरतीसंबंधी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत जाहीर झालेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून तुम्ही https://ibpsonline.ibps.in/mscepdec23/ या लिंकवर क्लिक करुन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करु शकता. अर्ज भरताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्या पुढीलप्रमाणे MSCE Pune Recruitment 2024
- अर्ज भरताना उमेदवाराने त्याची योग्य ती माहिती द्यावी.
- आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी
- परीक्षेची फी ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे, ती दिलेल्या पर्यायातून एक पर्याय निवडून भरावी.
- संगणक टायपिंगचे प्रमाणपत्र आणि MSCIT चे प्रमाणपत्र अवश्य जोडावे जे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अर्ज सादर करण्याती अंतिम तारीख
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत जाहीर झालेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 8 एप्रिल 2024 असून, इच्छूकांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावे. MSCE Pune Recruitment 2024