NEW Subsidy on Eclectic vehicle: इलेक्ट्रिक वाहनांवर 1 एप्रिलपासून नविन सबसिडी, नव्या नियमानुसार किती असेल सबसिडी?

NEW Subsidy on Eclectic vehicle: तंत्रज्ञान जसजसे वेगाने बदलत आहे तसेच त्याचे दुष्परिणामांना देखील मानवालाच सामोरे जावे लागत आहे. वाढते प्रदुषण आणि कमी होणारे पेट्रोल आणि डेझेलचे साठे ही दुहेरी दुष्परिणामांची देण आहे वाहने. या वाहनांवर पर्याय म्हणून ईलेक्ट्रिक वाहनांचा शोध लागला. अशी वाहने जी विजेने चार्ज करता येतील आणि दुसरे कोणतेही इंधन त्याला लागणार नाही. परंतू ही अशी वाहने वापरणार कोण हा देखील एक प्रश्नच होता. कारण पेट्रोल आणि डिझेल वापणाऱ्या ग्राहक वाहनचालकांना इलेकट्रिक वाहनांकडे कसे वळवायचे आणि प्रदुषणाला आळा कसा घालायचा यावर उपाय म्हणून भारत सरकारने एक योजना आखली. ती म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर ग्राहकांना सबसिडी देण्यात आली. परंतु शासनाने 31 मार्च 2024 ला जुनी सबसिडी बंद करुन नविन सबसिडी सुरु केली आहे. मग इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवरील सबसिडिमध्ये कोणकोणते नविन बदल करण्यात आले आहेत ते आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

इलेक्ट्रइक वाहन खरेदीवरी जुनी सबसिडी बंद

इलेक्ट्रिक वाहन खरेदावर शासनामार्फत सबसिडी दिली जात होती त्याला Fame -2 असे नाव देण्यात आले होते. शासनामार्फत इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर देण्यात येणारी ही सबसिडी दिनांक 31 मार्च 2024 पासून बंद करण्यात आली आहे. आणि त्याबदल्यात नवीन सबसिडी सुरु करण्यात आली आहे. ही सबसिडी दिनांक 1 एप्रिल 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. NEW Subsidy on Eclectic vehicle

केवळ 4 महिने नविन सबसिडी सुरु राहणार

दिनांक 1 एप्रिल 2024 पासून सुरु करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवरील नविन सबसिडीवर केवळ 4 महिनेंच सुरु राहणार आहे. या योजनेमध्ये भारत सरकार 3.33 लाख इलेक्ट्रिक स्कुटरवर प्रत्येकी 10 हजार रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. म्हणजेच आधीच्या सबसिडी 22,000/- होती ती आता 10,000रु इतकी झाली आहे म्हणजेच ईव्ही स्कूटरसाठी सास्तीचे 12,000/- रुपये खरेदीदारांना द्यावे लागणार आहेत.

 इतकेच नाही तर 41 हजार तीन चाकींसाठी म्हणजेच रिक्क्षांसाठी 25,000 /- रुपयांची शासनाकडून सबसिडी मिळणार आहे. तसेच या वाहन खरेदीसाठी सरकार 50,000/- रुपयांचे कर्ज म्हणजेच आर्थिक पाठबळ देखील देणार आहे. या योजनेची मुदत मात्र 31 जुलै 2024 पर्यंतच आहे असे सांगण्यात येत आहे.  NEW Subsidy on Eclectic vehicle

जुन्या सबसिडीमध्ये आणि नविन सबसिडिमध्ये कोणता फरक आहे

इलेक्ट्रिक दुचाकी वाहन खरेदीवर शासनातर्फे देण्यात येणाऱ्या जुन्या सबसिडीमध्ये 22,000/- रुपये देण्यात येत होते परंतु आता केवळ 10,000/- रुपये इतकीच सबसिडी देण्यात येणार आहे.  तसेच तिनचाकी वाहनांवर 25,000/- इतकी नव्या नियमांनुसार सबसिडी देण्यात येणार आहे. NEW Subsidy on Eclectic vehicle

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे पेट्रोल डिझेलचा खर्च 25% ने कमी होतो

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे खाजगी वाहन चालवणे असो किंवा कंपन्यांच्या वाहनांचा वापर करणे असो अत्यंत खर्चिक झाले आहे. परंतु त्यावर पर्याय म्हणून आपण जर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला तर नक्कीच आपला पेट्रोल आणि डिझेलवर होणारा खर्च 25 टक्क्यांनी कमी होतो. म्हणूनच शासनाकडूनही इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली जावीत म्हणून सबसिडी देण्यात येते. NEW Subsidy on Eclectic vehicle

नविन सबिसिडीनुसरा 12,000/- रुपये जास्त द्यावे लागणार असले तरीही तुम्ही जरुर इलेक्ट्रिक स्कूटी किंवा एखादे इलेक्ट्रिक वाहनच खरेदी करावे. आपल्या परिसरातील हवा प्रदुषणमुक्त राहावी म्हणून “गो ग्रीन” या नाऱ्यानुसार आपण काम केले पाहिजे. सध्याच्या आपल्या राहणीमानानुसार आपल्याजवळ एखादे वाहन असणे अत्यंत आवश्यक असते. परंतु ते इलेक्ट्रिक असेल तर नक्कीच त्यामुळे प्रदुषण कमी होईल आणि आपले कामही होईल. NEW Subsidy on Eclectic vehicle

Leave a Comment