Railway Protection Force Bharti 2024: RPF अंतर्गत 4660 पदांसाठी 10वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

Railway Protection Force Bharti 2024रेल्वे विभाग ही केंद्रीय अखत्यारित येतो त्यामुळे या रेल्वेचा सुरक्षा दल देखील वेगळा आहे. प्रत्येक राज्यांतर्गत येणांरे गृहविभाग  आणि गृहविभागांतर्गत काम करणारे पोलिस कर्मचारी या रेल्वे सुरक्षा दलांतर्गत येत नाही. त्यामुळे रेल्वेचा स्वतंत्र सुरक्षा दल असून त्याला RPF म्हणजेच Railway Protection Force (RPF) असे संबोधले जाते. या रेल्वे सुरक्षा दलामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी शासन घेऊन आले आहे. 100 किंवा 200 नाही तर तब्बल 4660 पदांसाठी रेल्वे विभागामार्फत जाहिरात काढण्यात आली आहे. नक्की कोणकोणत्या विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत आणि अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची आवश्यक वयोमर्यादा किती असेल, वेतन किती मिळेल अशी एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून मिळतील. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आजच अर्ज दाखल करा.

रेल्वे सुरक्षा दलामार्फत कोणकोणत्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे?

रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच RPF अंतर्गत उपनिरिक्षक आणि हवालदार या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही दोन्ही पदे विविध श्रेणीतील आहेत. उपनिरिक्षक हे पद 2ऱ्या श्रेणीतील असून हवालदार हे पद 3ऱ्या श्रेणीतील आहे. Railway Protection Force Bharti 2024

किती जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे?

रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच RPF अंतर्गत उपनिरीक्षक पदाच्या 452 जागा आणि हवालदार पदाच्या  4208 जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.  म्हणजेच एकूण 4660 पदांसाठी रेल्वे विभागामार्फत जाहीरात देण्यात आली आहे.

आवश्यक वयोमर्यादा

  • उपनिरिक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्षे ते जास्तीत जास्त 28 वर्षे इतके असावे.
  • हवालदार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे पूर्ण ते जास्तीत जास्त 25 वर्षे  इतके असावे. Railway Protection Force Bharti 2024रेल्वे

येथे पहा दोन्ही पदांसाठीच्या जाहिराती

रेल्वे विभागामार्फत उपनिरिक्षक आणि हवालदार या दोन्ही पदांसाठी जाहिराती देण्यात आल्या आहेत. या जाहिराती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याच्या विविध लिंक आम्ही येथे देत आहोत. लेखात देण्यात आलेल्या माहितीबद्दल काही संभ्रम असल्यास तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अधिकृत जाहिरात पाहू शकता.

उपनिरिक्षक पदाची जाहिरात येथे पहा

https://drive.google.com/file/d/1szNll3rCdm2OCNq6lDZCRqUrq28Nr1SU/view

हवालदार पदासाठीची जाहिरात येथे पहा

https://drive.google.com/file/d/1-Oo0ZS6kY9tUCofI_rEEVc2h8YcshmoX/view

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

रेल्वे विभागांतर्गत जाहिर करण्यात आलेल्या रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच RPF भरती संदर्भातील संपूर्ण माहिती मिळविल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. Railway Protection Force Bharti 2024रेल्वे

  • https://www.rrbapply.gov.in/#/auth/home?flag=true  या लिंकवर क्किल करुन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता.
  • तुमची माहिती योग्य पद्धतीने भरा, सांगितलेल्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • तुमचे ओळखपत्र म्हणजेच आधारकार्ड. पॅनकार्ड तसेच तुमचा फोटो आणि सही देखील डिजिटल स्वरुपात बनवून अपलोड करा.
  • शेवटी अर्जाचा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा आणि सबमिट करा.

अर्ज करण्यासाठी शुल्क किती असेल?

रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच RPF अंतर्गत भरती करण्यात येणाऱ्या जागांसाठी अर्ज करताना उमेदवारांना काही शुल्क भरावे लागणार आहे. ते पुढील प्रमाणे. हे शुल्क अर्ज दाखल करताना ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.

  • सामान्य उमेदवारांना 500/- रु इतके शुल्क भरावे लागणार आहे.
  • आरक्षित उमेदवारांना म्हणजेच SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) या उमेदवारांना 250/- रुपये शुल्क भरावे लागणार आहे. Railway Protection Force Bharti 2024रेल्वे

रेल्वे सुरक्षा दलातील भरतीसाठी शारिरिक आर्हता

सुरक्षा दलामध्ये काम करायचे म्हणजे उत्तम शरीर देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे जाहिरातीनुसार पुढील शारिरिक आर्हता उमेदवारांची असणे आवश्यक आहे.

  • पुरुषांची उंची   165 सें.मी  तसेच छाती फुगवून 80 आणि न फुगवता 85 असणे आवश्यक
  • SC/ST पुरुषांची उंची – 160सें.मी. तसेच छाती फुगवून 76.2 आणि 81.2 असणे आवश्यक
  • गोरखा, गढ़वाली, मराठा, डोगरा जातींमधील पुरुषांची उंची – 163 सें.मी. तसेच छाती फुगवून 80 आणि न फुगवता 85 असणे आवश्यक
  • महिलांची उंची 157 सें.मी
  • SC /ST महिलांची उंची 152 सें.मी
  • गोरखा, गढ़वाली, मराठा, डोगरा जातींमधील महिलांची उंची 155 सें.मी

वेतन किती असेल

रेल्वे विभागांतर्गत असलेल्या रेल्वे सुरक्षा दल भरतीमधील उपनिरिक्षक आणि हवालदार या दोन्ही पदांना वेतन  श्रेणी वेगवेगळी असल्याने ती पुढे देण्यात आली आहे.

  • उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्यास महिना 35,400/- रुपये इतके वेतन असेल
  • हवालदार पदासाठी निवड झाल्यास महिना 21,700/- रुपये इतके वेतन असेल.

तसेच केंद्रीय वेतनश्रेणीनुसार इतर भत्ते देखील यासोबत जोडण्यात येतील. Railway Protection Force Bharti 2024रेल्वे

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

रेल्वे सुरक्षा दल भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 14 मे 2024 असून इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. Railway Protection Force Bharti 2024रेल्वे

Leave a Comment