MHA Recruitment 2024 : गृह मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती, कोणतीही परीक्षा नाही

MHA Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. गृह मंत्रालयात (MHA) काही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या जाहिराती नुसार रिक्त पदे भरली जाणार आहेत.

विविध पदांसाठी ही नोकर भरती होणार आहे. या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. या भरतीमुळे तरुणांना काहीसा दिलासा मिळेल. अशा परिस्थितीत काढण्यात आलेल्या नोकर भरती बाबत सविस्तर अशी माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, किती पगार मिळणार, वयाची अट, निवड प्रक्रिया, अर्जाची पद्धत, अर्ज कसा व कुठे करायचा याबाबत संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत. हा आर्टिकल व्यवस्थितपणे वाचा.

कोणत्या पदांसाठी भरती होणार ?
गृह मंत्रालय विभागानं काढलेल्या जाहिराती नुसार, गृह मंत्रालयातील असिस्टंट कम्युनिकेशन ऑफिसर (CY), असिस्टंट कम्युनिकेशन ऑफिसर आणि सहाय्यक ही पदे भरली जाणार आहेत. या अंतर्गत वेगवेगळ्या विभागांतील रिक्त पदे भरली जाणार आहेत.

किती पदासाठी होणार भरती ?
गृह मंत्रालय विभागात विविध पदाच्या रिक्त जागा आहेत. या मार्फत वेगवेगळ्या विभागातील एकूण 43 रिक्त पदे भरली जाणार आहेत. (grih mantralaya bharti 2024)

शैक्षणिक पात्रता काय हवी ? (Education Qualification)
जाहिरात मध्ये दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. तो उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच जे उमेदवार आधी, केंद्रीय पोलिस संघटना आणि केंद्रीय पोलिस सशस्त्र दल किंवा संरक्षण संस्था आणि राज्य पोलीस संघटना किंवा केंद्रशासित पोलीस संघटनेसाठी कार्यरत आहेत, ते देखील या पदासाठी अर्ज करू शकतात.

किती पगार मिळणार ?
तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला चांगले वेतन मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 35,400 रुपये ते 1,12,400 रुपयांपर्यंत दर महिन्याला पगार मिळेल. (mha bharti 2024)

वयाची अट (Age Limit)
कम्युनिकेशन ऑफिसर आणि असिस्टंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया कशी असणार ?
या पदासाठी अर्ज करणाऱ्या शॉर्ट लिस्ट केल्यानंतर, मुलाखत (Interview) घेतली जाईल. मुलाखतीच्या कामगिरीवर तुमची निवड केली जाईल. अशाप्रकारे निवड प्रक्रिया असेल.

अर्ज ऑफलाईन की ऑनलाईन ?
अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत नाही. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावयचा आहे. दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. (MHA Recruitment Notification 2024)

अर्ज करण्याची शेवटची तारीख
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार असून यासाठी 22 जून 2024 ही शेवटची तारीख आहे. विहित कालावधीमध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करायचा असून विहित कालावधी उलटल्यानंतर या पदासाठी अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद उमेदवाराने घ्यायची आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Joint Director (Admn), DCPW (MHA),Block No.9, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003

अधिक माहितीसाठी https://www.mha.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी.

मंत्रालय विभागात होणाऱ्या भरतीची जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://shorturl.at/BMPY8

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आली आहे. गृह मंत्रालय विभागात विविध पदांसाठी भरती होत असून, उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या नोकर भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती तुम्हाला समजली असेल. परंतु, अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात डाऊनलोड करून संपूर्ण जाहिरात वाचावी. ही माहिती आपल्या मित्रांना देखील नक्की पाठवा.

Leave a Comment