Shet tale subsidy शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी लागेल ती मदत शासनामार्फत होत असते. त्यासाठी विविध प्रकारच्या योजना देखील राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेततळे अनुदान योजना. या योजनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांना शेतात पिक घेण्यासाठी आवश्यक पाणीपुरवठा करणारे शेततळे बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेचे काही निकष असून लाभार्थी शेतकऱ्यांची पात्रता देखील नमूद करण्यात आली आहे. या योजनेची अधिक माहिती घेऊ
शेततळ्याचे आकारमान
शेततळे अनुदान योजनेंतर्गत कमाल 30 x 30 x 3 मीटर आकारमानाचे कमीतकमी 15 x 15 x 3 मीटर आकारमानाचे शेततळे बांधण्यास शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल. या योजनेंतर्गत 30 x 30 x 3 मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी 50,000/- रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या छोट्या आणि मोठ्या शेततळ्याच्या आकाराप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. त्यासंदर्भात माहिती आपण पुढे पाहूच.
शेततळे खोदण्यासाठी मिळणार दीड लाखांचे अनुदान
- शेततळ्यात वर्षाचे 12 ही महिने पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेततळेही अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे खोदून तयार करण्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना शेततळ्याच्या आकारानुसार अनुदान दिले जाते ते पुढील प्रमाणे
- शेतकऱ्यांना 15 X15 आकाराचे शेततळे खोदण्यासाठी 18,621/- रुपये आणि या शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी 28,245 रुपये अनुदान देण्यात येते.
- शेतकऱ्यांनी 20X 15 आकाराचे शेततळे खोदायचे ठरवले तर त्यांना खोदाईसाठी 26674 रुपये तर अस्तरीकरणासाठी 31 हजार 598 रुपये अनुदान देण्यात येते.
शेततळे योजना 2024 उद्दिष्टे
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले आहे. पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही तर राज्याच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परीस्थिती निर्माण झाली आहे, आणि जमिनीतल्या पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाराही महिने शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासन शेततळे योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येते. शेती पिकाचे पाण्याविना होणारे नुकसान टाळणे हा एक महत्त्वाचा हेतू या योजनेचा आहे.
शेततळे योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
- https://aaplesarkar.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करुन तुम्ही योजनेसंबंधीत अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
- या लिंकवर क्लिक करुन तुम्ही योजनेसाठी अर्ज करु शकता आणि बारमाही शेततळे बांधून अनुदान मिळवू शकता. https://egs.mahaonline.gov.in/Site/Shetatale
शेततळे योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- जातीचा दाखला
- जमिनीचा 7/12 उतारा व ८–अ प्रमाणपत्र
- आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
- प्रतिज्ञा पत्र (स्वतःच्या स्वाक्षरी सहित)
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेचे फायदे
ज्या भागातील शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती त्यांना या योजनेचा लाभ होऊन त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना दुरून सिंचनासाठी पाण्याचा प्रबंध करण्याची गरज पडणार नाही.
- शेततळ्यामुळे सिंचन करणे शक्य होईल.
- शेतकऱ्यांच्या पिकाचे पाण्याअभावी नुकसान होणार नाही. परिणामी पिकाच्या उत्पादनात वाढ होईल.
- पाण्याअभावी पीक येत नाही त्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येतील.
- मागेल त्याला शेततळे योजनेचेमध्ये मिळणारे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
मागेल त्याला शेततळे योजना नियम व अटी
- केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच शेततळे योजनेचा लाभ घेता येईल कारण ही महाराष्ट्र राज्य सरकारची योजना आहे.
- अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
- या योजनेंतर्गत नियुक्त केलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी, निश्चित केलेल्या आकारमानानुसार शेततळे बांधणे बंधनकारक राहील.
- शेततळे तयार करण्याचा अधिकाऱ्यांकडून आदेश मिळाल्यानंतर काम हे तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.
लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःच राष्ट्रीय बँक किंवा इतर बँकमधील खाते क्रमांक सबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्ससह सादर सादर करणे गरजेचे आहे.