Panchayat Samiti Yojana: पंचायत समिती लाभार्थी यादी 2024

भारतात केंद्रीय योजना ग्रामिण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी पंचायत समितीची स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायत असे या संस्थेस नाव देण्यात आले. या ग्रामपंचायतीमध्ये केंद्रीय तसेच राज्य स्तरीय विविध योजना राबवल्या जातात. मनरेगाच्या माध्यमातून या योजना ग्रामिण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी राबवल्या जातात. आज आपण या लेखाच्या माध्यमातून पंचायत समितीमधील लाभार्थी यादी तपासणार आहोत आणि पंचायत समिती स्तरावर कोणकोणत्या योजना राबवल्या जातात दे देखील पाहणार आहोत.

पंचायत समितीसाठी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

पंचायत समितीमध्ये ज्या योजना असतात त्यांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात. ती पुढीलप्रमाणे

  • आधारकार्ड
  • निवासस्थानाचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • उत्पन्नाचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र – योजनेनुसार

पंचायत समिती योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

पंतायत समितीमधील विविध योजनांना अर्ज करताना अर्जदाराची पात्रता देखील तपासली जाते. हे पात्रता निकष प्रत्येक योजनेनुसार बदलत असतात. Panchayat Samiti Yojana

  • अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • काही योजनांसाठी वय मर्यादा 60 वर्षे पर्यंत असते.
  • संबंधित पंचायत समितीच्या परिसरात अर्जदार निवासी असणे आवश्यक आहे.
  • काही योजनांमध्ये विशिष्ट जातींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
  • जात प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते.

पंचायत योजना कुठे तपासाव्या?

तुमच्या गावात कोणकोणत्या पंचायत योजना राबवल्या जात आहेत आणि त्या योजनांतर्गत कोण कोण लाभ घेत आहे किंवा कोणी कोणी यापूर्वी लाभ घेतलेला आहे हे तुम्ही आता ऑनलाईन तपासू शकणार आहात. Panchayat Samiti Yojana

https://nregastrep.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18 या लिंकवर क्लिक करुन तुमच्या गावची पंचायत समिती योजना लाभार्थी यादी तपासू शकता.

  • सर्वप्रथम तुमचे राज्य, जिल्हा आणि गाव सिलेक्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला ज्या वर्षातील पंचायत समितीचे लाभार्थी तपासायचे आहेत ते वर्ष सिलेक्ट करा
  • त्यानंतर तुम्हाला एक चार्ट दिसेल त्या चार्ट प्रमाणे तुम्ही तुमच्या गावातील लाभार्थी तपासू शकता आणि तेथे योजनां देखील देण्यात आल्या आहेत.

पंचायत समिती योजनांचे विभाग

पंचायत समिती योजना या विविध पातळीवर राबवल्या जातात

  • पशुसंवर्धन विभाग
  • महिला व बालकल्याण विभाग
  • कृषी विभाग

पंचायत समिती पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना

  • मैत्रीण योजनेंतर्गत महिलेने खरेदी केलेल्या म्हशी किंवा गायीच्या एकूण किमतीच्या 50% अनुदान देणे.
  • मुक्त गोठ्याची स्थापना करण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांना रु. 15,000 रुपये दिले जातात .
  • जिल्हा परिषद निधीच्या उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेंतर्गत दूध काढण्याचे उपकरण खरेदीसाठी 15,000 रु. अनुदान म्हणून दिले जातात.
  • 15 मेट्रिक टन मुरघास युनिट तयार करण्यासाठी 15,000 रु. दिले जातात.  
  •  कुक्कुट पालनासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते.

पंचायत समिती महिला बालकल्याण विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजना

  • ग्रामीण महिलांना  आत्मनिर्भर होण्यासाठी चारचाकी चालवण्याचा परवाना आणि प्रशिक्षण घेण्यासाठी 3,000रु. दिले जातात.
  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत संगणक शिक्षणासाठी इयत्ता 7 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना 4,000रु. अनुदान दिले जाते.
  • झेरॉक्स मशीन घेऊन रोजगार मिळविण्यासाठी अपंग व्यक्तीस अनुदान दिले जाते.
  • MS-CIT अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या मुलींच्या खात्यांत 3500/- रु. बक्षीस म्हणून दिले जाते.
  • काही जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता 5 मधील विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करण्यासाठी  4500 रुपयांचे अनुदान मिळते .

पंचायत समिती कृषी विभागांतर्गत योजना

  • शेतकऱ्यांना 5HP डिझेल पंप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
  • शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते जेणेकरून ते त्यांच्या शेतासाठी 2.5-इंच पीव्हीसी पाईप खरेदी करू शकतील.
  • शेतकऱ्यांना 3.0 इंच पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी निधी दिला जातो .
  • इलेक्ट्रिक कडबकुट्टी यंत्राच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य.
  • गीर, थारपारकर किंवा साहिवाल गाईंच्या खरेदी किमतीच्या 75% किंवा 45000/- यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाईल.
  • हिरवळीच्या खतासाठी अनुदान दिले जाते .
  • 200 लिटरचा सोलर वॉटर हीटर 50% कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

Leave a Comment