Internet tips: इंटरनेट सुरू केल्या केल्या लगेच संपते का? या एका सेटिंग ने नेट संपणारच नाही.. फक्त करा एवढंच…

Internet tips: सध्याच्या या काळात इंटरनेट हा आपल्या जवळचा आणि आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच बनला आहे. आपण अनेक प्रकारची माहिती मिळवण्यासाठी, तसेच लोकांशी कनेक्ट राहण्यासाठी आणि स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी मोबाइल डेटाचा हमखास वापर करतो. परंतु अनेकदा तुमचा डेटा प्लॅन लवकर संपतो आणि तुम्हाला पुन्हा रिचार्ज करुन डेटा खरेदी करावा लागतो. मात्र आता तुम्हाला याची गरज पडणार नाही, कारण आम्ही तुम्हाला डेटा सेव्ह करण्याच्या काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

मोबाईल डेटा सेव्ह करण्यासाठी या टिप्सचा वापर करा

वाय-फाय वापरा | Use wifi

तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही मोबाईल डाटा ऐवजी वाय-फाय कनेक्शन वापरा. घरी, तुमच्या ऑफिस मधे आणि सार्वजनिक ठिकाणी देखील (जसे की कॅफे आणि रेस्टॉरंट) मोफत वाय-फाय उपलब्ध करून देण्यात येते, त्याचा तुम्ही वापर करू शकता.

तुम्ही किती डेटा वापरत आहात ते मॉनिटर करा | Data monitoring

तुमच्या फोनमध्ये काही डेटा वापर मॉनिटरिंग टूल्स दिले गेलेले आहेत, जे तुम्हाला तुमच्या फोनमध्ये कोणते ॲप्स सर्वाधिक डेटा वापरत आहेत, हे ओळखण्यात मदत करू शकतात. अशा प्रकारे, तुम्ही जास्त डेटा वापरत असलेले ॲप्स सहज ओळखू शकणार आहात आणि त्यांचा वापर देखील कमी करू शकणार आहात.

बॅकग्राऊंड ला असणारे ॲप्स बंद करा | Background Apps

अनेक ॲप्स बॅकग्राउंडमध्ये चालतात आणि तुम्ही ॲक्टिवली वापरत नसतानाही हे ॲप डेटा वापरतात. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हे बॅकग्राउंड ॲप्स बंद करू शकणार आहात.

इमेजेस कमी प्रमाणत डाउनलोड करा | Low Resolution

सोशल नेटवर्क्सवरून इमेजेस आणि व्हिडिओ जर आवश्यकता असेल तरच डाउनलोड करा. तुम्हाला इमेज डाउनलोड करायची असल्यास, कृपया कमी रिझोल्यूशन निवडा.

व्हिडिओ स्ट्रिमिंग ची क्वालिटी कमी करा | Video Streaming

जर तुम्ही सुद्धा YouTube आणि Netflix सारखे प्लॅटफॉर्म मूव्ही किंवा वेब सिरीज बघण्यासाठी वापरत असाल तर, हे सर्व बघताना व्हिडिओची क्वालिटी कमी करा.

ऑफलाइन मोड वापरा | Offline Mode

तुम्ही काही ॲप्स मधे जसे की Google Maps सारख्या ॲप्समध्ये, ऑफलाइन मोडचा वापर करूनही तुमचं काम करू शकता त्यामुळे तुम्हाला डेटा वापरण्याची गरज पडत नाही.

डेटा सेव्हर मोड वापरा | Data Saver

अनेक ॲप्समध्ये डेटा सेव्हर मोड असतो, जे डेटा वापर कमी करण्यासाठी त्या ॲप मधील वैशिष्ट्य सक्षम करते.

डेटा compress करणाऱ्या ॲप्सचा वापर करा | Data compressor

अनेक ब्राउझर जसे की Opera Mini आणि UC Browser हे डेटा कॉम्प्रेस करतात, ज्यामुळे डेटाचा कमी वापर होतो.

Video call आणि audio call

व्हिडिओ कॉलऐवजी ऑडिओ कॉलचा पर्याय निवडा. व्हिडिओ कॉल्स जास्त डेटा वापरतात.

तुमचा मोबाईल डेटा प्लॅन निवडताना काळजी घ्या | Data Plan

तुमचा डेटा प्लॅन हा तुमच्या गरजेनुसारच निवडा. अनेकदा काही महागडे प्लॅन्स जास्त डेटा देतात मात्र तो तुम्ही वापरत सुद्धा नाही.

ॲप्ससाठी ऑटो अपडेट्स बंद करा | Disable Auto Updates

आपल्या स्मार्टफोन्सवर ऍप्लिकेशन्सची संख्या खूप जास्त असते आणि यामुळेच कधीकधी हे ॲप मोबाईल डाटा चा वापर करून स्वतःच अपडेट होत असतात. या ऑटो अपडेट्स मुळे ॲप्स मधे काही नवीन वैशिष्ट्ये आणि सुधारणा देखील बघायला मिळते, परंतु या मुळे मोठ्या प्रमाणात डेटा देखील वापरला जातो. तर यासाठी अश्या ॲप्सचे ऑटो अपडेट होणे बंद केल्याने आपला बराच डाटा वाचू शकणार आहे.

हे ऑटो अपडेट्स बंद करण्यासाठी, तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जवर जा आणि “App Store” किंवा “Play Store” पर्याय शोधा. त्यानंतर तेथून, “auto update disable” करा किंवा “don’t auto update app’s” किंवा “auto update on wifi” हे पर्याय निवडा. या सेटिंग मुले ॲप अपडेट्सवर तुम्हाला नियंत्रण ठेवता येणार आहे आणि परिणामी तुमचं इंटरनेट बऱ्याच प्रमाणात सेव्ह होईल.

या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा मोबाईल डेटा वाचवू शकता आणि सोबतच बरेच पैसेही वाचवू शकता.

Leave a Comment