आज आपल्या सर्वांच्याच हातात फोन आले आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फोनमध्ये इंटरनेटचा वापर केला जातो. कमी खर्चात मिळणारा रोजचा एक ते दोन MB डाटा इंटरनेट वापरण्यासाठी पुरेसा असतो. यामुळे अनेकांना या ऍडिक्शनच्या मायाजाळात ओढण्याचा खेळ सुरु असते. अनेक सोशल मिडिया ऍप्स आणि प्लॅटफॉर्म्स जास्तीत जास्त ग्राहक किंवा व्हिवर्स त्यांच्यामध्ये गुंतून रहावे यासाठी विविध गोष्टी करीत असतात. यामुळे अनेकांना सोशल मिडियाचे ऍडिक्शन लागत आहे. चला तर मग आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण सोशल मिडियाच्या या हळू हळू वाढत जाणाऱ्या ऍडिक्शनबद्दल अधिक जाणून घेऊ आणि त्यावर उपाय देखील जाणून घेऊ. Remove your social media addiction
सोशल मिडियावरील विविध प्लॅटफॉर्म
सोशल मिडियावर इन्टाग्रॅम, फेसबूक सारखे सतत काहीना काही दाखवणारे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. तसेच आता OTT सारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देखील वेबसिरीज आणि चित्रपट अगद सहज बघता येतात. महिना 100 ते 200 रुपये शुल्क भरुन हे चित्रपट पाहता येतात. इतकेच नाही तर फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या ऍप्सच्या माध्यमातून येणारे छोटे छोटे रिल्स आणि शॉट्स पाहत तर व्यक्ती तासनतास मोबाईलमध्येच अडकून पडतो. Remove your social media addiction
सोशल मिडियाचे ऍडिक्शन कसे वाढत जाते?
इंन्साग्राम आणि फेसबुकवर येणाऱ्या रिल्स आणि शॉर्ट्स कधीही न संपणारे आहे. ते एकदा पहायला सुरुवात केली की व्यक्ती कितीही तास हे पाहतच राहतो. व्यक्तीला वाटते की आपण काहीतरी नवीन माहिती मिळवत आहोत परंतु त्या तासन तास मोबाईल हातात घेऊन असलेल्या व्यक्तीला हे कळत नाही की या सर्व गोष्टी पाहण्यात त्या व्यक्तीचा किती वेळ वाया गेला आहे. असे एक नाही अनेक किस्से आपण पाहू शकतो की व्यक्ती एकदा हे रिल्स पाहू लगला की रात्र संपून दिवस कधी सुरु होतो किंवा दिवस संपून रात्र सुरु होते हे कळत नाही. Remove your social media addiction
सोशल मिडिया ऍडिक्शनमुळे होणारे आजार
सोशल मडियाच्या ऍडिक्शनमुळे अनेक आजार होताना पण पाहू शकतो. तासनतास मोबाईलच्या स्क्रीन पाहत राहिल्याने अनेकांना डोळ्याचे आजार होत आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोग डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. तसेच तासनतास मोबाईल बघितल्यामुळे मेंदूचे देखील आजार होताना आपण पाहू शकतो. इतकेच नाही तर सतत कानांना इयरकॉड लावून मोबाईल पाहिल्याने कानांच्या पडद्यावर देखील त्याचा परीणाम होताना दिसून येत आहे. डोळे, कान, मेंदू या महत्त्वाचे अवयवांसंदर्भात सोशलमिडियाच्या ऍडक्शनमुळे समस्या उद्भवताना दिसून येत आहे.
सोशल मिडिया ऍडिक्शवर उपाय
सोशल मिडियाच्या या ऍडिक्शन पासून तुम्हाला स्वतःला वाचवायचे असेल तर खालील उपाय तुम्ही जरुर केले पाहिजेत,
- इन्स्टाग्राम, फेसबूकसारखे ऍप शक्यतो आपल्या मोबाईलमधून अनइन्स्टॉल करा. किंवा त्यांचे नोटिफिकेशन्स बंद करा.
- तुम्ही तुमच्या मोबाईलचा स्क्रीनटाईम किती आहे ते तपासण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये सेटिंग करा आणि त्यामध्ये 1 तासाच्या वरती स्क्रीनटाईम झाल्यास मोबाईल ब्लॅकआटचा पर्याय निवडा. जेणेकरुन तुम्ही 1 तासापेक्षा जास्त काळ मोबाईलमध्ये असाल तर आपोआप तुमचा फोन बंद होईल.
- मोबाईलपासून होणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी शक्य तितका वेळ इतर ऍक्टिविटीमध्ये घालवा. धावणे, फिरणे किंवा तुमचा एखादा छंद असेल तर त्या छंदासाठी वेळ द्या.
आजच्या तारखेस मोबाईल ऍडिक्शन ही अत्यंत गंभीर समस्या झाली आहे. त्यापासून दूर राहण्यासाठी हे पर्याय तुम्हाला खूप मदतगार ठरतील. Remove your social media addiction