Indian Postal Department Bharti 2024: 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी… भारतीय पोस्ट विभागात तब्बल 44,228 जागांवर मेगा भरती.. पगार सुद्धा एवढा..

Indian Postal Department Bharti 2024: मित्रांनो, जर तुम्ही देखील सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न बघत असाल आणि तुमचे शिक्षण किमान 10वी पास असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठीच आहे. ग्रामीण डाक सेवकच्या 44228 पदांसाठी भारतीय टपाल विभागात भरती जाहीर केली गेली आहे. अधिकाधिक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा व सरकारी नोकरी मिळवावी. Indian Postal Department Bharti 2024

शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria for Indian Postal Department Bharti 2024

या पदासाठी अर्जदाराने 50% गुणांसह 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक असणार आहे.

नोकरीसाठी वयाची मर्यादा किती आहे? | Age Criteria for Indian Postal Department Bharti 2024

उमेदवारांचे वय 18 ते 36 वर्षे दरम्यान आहे. ओबीसी, अनुसूचित जमाती आणि राखीव प्रवर्गासाठी वयात सवलत दिली जाते. या सवलतीचा अर्थ असा आहे की उमेदवार या पदासाठी वयाची 40 वर्षे पूर्ण करत असले तरीही अर्ज करू शकतात.

परीक्षेसाठी फी किती असेल? | Application Fees for Indian Postal Department Bharti 2024

100 रुपये परीक्षा फी, सामान्य/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी आकारली जाणार नाही.

पदासाठी निवड झाल्यानंतर पगार किती असेल?

भारतीय टपाल खात्याच्या नोकरीच्या जाहिरातीमध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणून निवड झाल्यानंतर, मासिक वेतन रु. 10,000/- ते रु. 29,380/- च्या श्रेणीत आणि इतर सरकारी नोकरी भत्त्यांसह असेल.

नोकरीचे ठिकाण कोणते असेल?

भारतातील सर्व राज्यांमध्ये भारतीय टपाल विभाग काम करत असल्याने, तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला भारतातील कोणत्याही राज्यात काम करण्याची संधी मिळेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

5 ऑगस्ट 2024 भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावेत.

निवड प्रक्रिया कशी होईल? | Selection Process

भारतीय टपाल विभागाने जाहीर केलेल्या भरतीसाठी खालील निवड प्रक्रिया समाविष्ट केली गेली आहे.

लेखी परीक्षा: अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सुरुवातीला लेखी परीक्षा घेतली जाते ज्यामधून मेरिट लिस्ट मधे आलेल्या उमेदवारांची निवड केली जाते.

कागदपत्रांची पडताळणी: निवडलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर, ज्या उमेदवारांचे कागदपत्र बरोबर असतील त्यांनाच नोकरी दिली जाणार आहे.

याठिकाणी करा अर्ज | Apply Here for Indian Postal Department Bharti 2024

तुम्ही खाली दिलेल्या या लिंकवर क्लिक करून भारतीय टपाल विभाग भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: https://indiapostgdsonline.gov.in/.

तुम्हाला तुमचे राज्य या वेबसाइटच्या होमपेजवर निवडावे लागेल. राज्य निवडून झाल्यावर, तुम्हाला तुमच्या राज्याच्या अंतर्गत जी लिंक दिली असेल त्यावरून ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.

भरती जाहिरात:

तुम्ही या लिंकवर क्लिक करून संबंधित भरती सूचना पाहू शकता: https://indiapostgdsonline.cept.gov.in/Notifications/Model_Notification.pdf. आणि आपण अधिक माहिती मिळवू शकता. Indian Postal Department Bharti 2024

Leave a Comment