IOCL Recruitment 2024: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. मार्फत 476 जागांसाठी भरती सुरु; भरघोस पगाराची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी

IOCL Recruitment 2024: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी आहे. भारतातील 7 सर्वात मोठ्या  कंपन्यांपैकी एक असलेली इंडियन ऑइल महसूलानुसार देशातील सर्वात मोठी तर जगातील 88 वी मोठी कंपनी आहे. भारतामध्ये पुरवली जाणारी49 टक्के खनिज तेल उत्पादने इंडियन ऑइल व तिच्या पाल्य कंपन्यांतर्फे बनवण्यात येतात. संपुर्ण भारतभर इंडियन ऑइलचे 20,757 पेट्रोल पंप तर एल.पी.जी. सिलेंडर पुरवणारे 5,934 वितरक आहेत.

याच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा यासाठी आम्ही ही माहिती घेऊन आलो आहोत. IOCL Recruitment 2024

अर्ज प्रक्रिया कधीपासून सूरू झाली?

अर्ज प्रक्रिया दिनांक 22 जुलै 2024 पासून सुरु झाली आहे. तरी जे इच्छूक पात्र उमेदवार आहे त्यांनी लवकरात लवकर या  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमार्फत जाहीर झालेल्या पदासांठी ऑनलाईन अर्ज करावा. 

भरतीसाठी जागांविषयीची माहिती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत जाहीर झालेल्या पदभरतीमध्ये एकूण रिक्त जागा 476 आहेत. त्यामध्ये विविध पदे असून कोणकोणत्या पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे जे आपण जाणून घेऊ. तसेच त्या पदासाठी अर्ज करताना शैक्षणिक पात्रता काय असावी ते देखील आपण पुढील माहितीच्या मदतीने जाणून घेऊ. IOCL Recruitment 2024

  • नॉन-एक्झिक्युटिव्ह असलेल्या कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजेच Junior Engineering Assistant पदाच्या  एकूण 379 जागा रिक्त आहेत. या पदासाठी  Diploma, B.Sc पदवीधर उमेदवार अर्ज दाखल करु शकतील.
  • कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक  म्हणजेच Junior Quality Control Analyst पदाच्या 21 जागा रिक्त आहेत. या पदासाठी  B.Sc पदवीधर असलले उमेदवार अर्ज दाखल करु शकतील.
  • अभियांत्रिकी सहाय्यक  म्हणजेच Engineering Assistant पदाच्या  38 रिक्त असून  Diploma धारक उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतील.
  • तांत्रिक परिचर म्हणजेच Technical Attendant पदाच्या 29 जागा रिक्त असून  10th, ITI धारक उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतील.

आवश्यक वयोमर्यादा

कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांची वयोमर्यादा  अत्यंत महत्त्वाची असते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत जाहीर झालेल्या भरतीमधाये देखील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी  18 वर्षे  ते 26 वर्षे इतके ठेवण्यात आले आहे. आरक्षित प्रवर्गाला वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

परीक्षा फी किती असेल

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत जाहीर झालेल्या पदभरतीच्या परीक्षेची  फी 300/- इतकी असून  आरक्षीत प्रवर्गासाठी म्हणजेच SC/ST प्रवर्गासाठी कोणतीही फी  आकारण्यात येणार नाही

भरतीसंबंधीत जाहिरात येथे पहा IOCL Recruitment 2024

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईट  https://iocl.com/ येथे भेट देऊ शकता तसेच यासंदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन तुम्ही जाहिरात पाहू शकता.  https://missionmpsc.com/wp-content/uploads/2024/07/IOCL-bharti.pdf


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करुन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकते. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/89908/Index.html

  • सर्वप्रथम तुमच्या इमेल आयडी किंवा मोबाईल नंबरच्या मदतीने तुम्ही लॉगीन करा.
  • तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाची निवड करा आणि सांगितल्या प्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरा.
  • योग्य ती कागदपत्रे अपलोड करा, डिजिटल सही आणि फोटो देखील अपलोड करा.
  • फॉर्म भरुन झाल्यानंतर एकदा वाचा आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन भरुन सबमीट बटणावर क्लिक करा.

 अर्ज करण्याची अंतिम तारीख

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये  तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज दाखल करावा.  IOCL Recruitment 2024

Leave a Comment