भारतात प्रत्येक राज्यांतर्गत होमगार्ड हा विभाग असून होमगार्ड हे पोलीस दलाला सहाय्यकारी दल म्हणून काम करतात. राज्यांतर्गत सुरक्षा राखण्याकरिता पोलीस दलाला मदत करणे होमगार्ड संघटनेचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. अग्निशमन, विमोचन, पूरपरिस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती अशा निरनिराळया प्रकारच्या परिस्थितीच्या वेळी होमगार्ड संघटना कार्यरत केली जाते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होमगार्ड विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात देण्यात आली आहे. चला तर मग पाहू या भरतीसंदर्भातील अतिरिक्त माहिती. Home guard Bharti 2024
किती रिक्त पदे भरण्यात येणार आहेत?
महाराष्ट्र राज्यात गृह रक्षक म्हणजे होमगार्ड पदाच्या तब्बल 6500 पेक्षाही जास्त जागांवर महाभरती जाहिर करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यांतर्गत नेमकी किती पदे रिक्त आहेत आणि किती पदांवर पदभरती जाहिर करण्यात आली आहे ते आपण पुढे पाहू.
जिल्हा निहाय गृहरक्षक पदांचा पदभरतीचा तपशील
- सातारा 471 रिक्त पदे
- रत्नागिरी 458 रिक्त पदे
- नांदेड 325 रिक्त पदे
- जळगाव 325 रिक्त पदे
- चंद्रपुर 82 रिक्त पदे
- सिंधुदुर्ग 177 रिक्त पदे
- यवतमाळ 121 रिक्त पदे
- धुळे 138 रिक्त पदे
- हिंगोली 75 रिक्त पदे
- बीड 234 रिक्त पदे
- अमरावती 141 रिक्त पदे
- वाशिम 59 रिक्त पदे
- धाराशिव 237 रिक्त पदे
- भंडारा 31 रिक्त पदे
- गडचिरोलरी 141 रिक्त पदे
- लातुर 143 रिक्त पदे
- रायगड 313 रिक्त पदे
- पुणे 1800 रिक्त पदे
- सांगली 632 रिक्त पदे
- नंदुरबार 79 रिक्त पदे
- नाशिक 130 रिक्त पदे
- छ.संभाजीनगर 466 रिक्त पदे
- कोल्हापुर 287 रिक्त पदे
- वर्धा 76 रिक्त पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य गृहविभागांतर्गत होमगार्ड पदाच्या भरतीसाठी तुम्ही अर्ज करणारी व्यक्ती सदर इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Home guard Bharti 2024
आवश्यक वयोमर्यादा
महाराष्ट्र राज्य गृहविभागांतर्गत होमगार्ड पदाच्या भरतीसाठी वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे त्याप्रमाणे उमेदवाराचे वय 20 वर्षे ते 50वर्षे वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे.
आवश्यक शारीरिक पात्रता
होमगार्ड भरती म्हणजे उमेदवार शरिराने मजबूत आणि सडपातळ असणे आवश्यक आहे. त्यासाठी महिला व पुरुषांसाठी उंची आणि धावण्याची क्षमते प्रमाणे पात्रतेचे नियम जाहीर करण्यात आले आहेत. त्याप्रमाणेच निवड होणार आहे. Home guard Bharti 2024
- पुरुष – उंची 162 से.मी, छाती 79 सेमी व 5 सेमी फुगवता आली पाहीजे, धावणे 1600 मीटर
- महिला – उंची – 150 से.मी, छाती 79 व 5 सेमी फुगवता आली पाहिजे, धावणे 800 मीटर
येथे अर्ज करा
महाराष्ट्र राज्य गृहविभागांतर्गत होमगार्ड पदाच्या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास इच्छूक उमेदवारांनी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. Home guard Bharti 2024
अधिक माहितीसाठी जाहिरात
महाराष्ट्र राज्य गृहविभागांतर्गत होमगार्ड पदाच्या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या लिंकवर क्लिक करुन जाहिरात पाहू शकता.
अर्ज करण्याची अंतीम तारीख
महाराष्ट्र राज्य गृहविभागांतर्गत होमगार्ड पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याचा अंतीम दिनांक 16 ऑगस्ट 2024 पर्यंत देण्यात आला आहे. या तारखेच्या आधी इच्छूक उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. Home guard Bharti 2024
महाराष्ट्रातील तरुणा तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने या महाराष्ट्र गृहविभागांतर्गत होमगार्ड पदाच्या भरतीसाठी अर्ज करावे, प्रत्येक जिल्ह्यांतर्गत पदे जाहीर करण्यात आलेली आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीचे ठिकाण मागू शकणार आहात. अर्जदारांनी भरतीसंबंधीत संपूर्ण माहिती वाचून मगच अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने भरलेला अर्ज एकदा तपासून मगच सबमीट करावा. Home guard Bharti 2024