arogya vibhag bharti 2023:- आरोग्य विभागाची 10949 जागाची भरती

arogya vibhag bharti 2023

arogya vibhag
  • arogya vibhag bharti 2023 आरोग्य विभागाची गट क व गट ड च्या 10949 हजार जागांसाठी जाहिरात आली आहे . ठाण्यातील रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्य सेवक भरतीला वेग आला
    आरोग्य विभागातील क आणि ड वर्गाच्या पदांसाठी ही जाहिरात असे

अनेक दिवसांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती, आता ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर या प्रक्रियेला वेग आल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते.

arogya vibhag bharti 2023 ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10949 जागांसाठी ही जाहिरात आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे.

गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे.

सार्वजनिक आरोग्य( arogya vibhag bharti 2023) विभागातील वरिष्ठ पदे रिक्त असल्याने त्याचा भार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर पडत आहे. या कार्यपद्धतीवर अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे ही रखडलेली नोकर भरती पूर्ण करण्यासाठी वेग आलेला पाहायला मिळतंय.
आरोग्य विभाग जाहिराती

आठ आरोग्य सेवा मंडळात नोकरभरती खालीलप्रमाणे..

१)मुंबई आरोग्य सेवा मंडळ,ठाणे-विविध २६ पदांसाठी एकूण ८०४ जागा

२)पुणे आरोग्य सेवा मंडळ,पुणे-विविध ४५ पदांसाठी एकूण १६७१ जागा

३)नाशिक आरोग्य सेवा मंडळ,नाशिक -विविध २९ पदांसाठी एकूण १०३१ जागा

४)कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ,कोल्हापूर-विविध २५ पदांसाठी एकूण ६३९ जागा

५)छत्रपती संभाजीनगर आरोग्य सेवा मंडळ,संभाजीनगर-विविध २३ पदांसाठी एकूण ४७०जागा

६)लातूर आरोग्य सेवा मंडळ,लातूर-विविध २०पदांसाठी एकूण ४२८ जागा

७)अकोला आरोग्य सेवा मंडळ,अकोला-विविध २२ पदांसाठी एकूण ८०६ जागा

८)नागपूर आरोग्य सेवा मंडळ,नागपूर-विविध २५ पदांसाठी एकूण १०९० जागा

एकूण- ६ हजार ९३९ पदे गट क
व ४ हजार १० पदे गट ड

एकूण – १० हजार ९४९ पदांसाठी पदभरती

Leave a Comment