SBI Recruitment 2023: ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ मध्ये PO पदासाठी २००० भरती
SBI PO Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये PO पदासाठी भरती सुरू आहे . भरती अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (Probationary officer) पदाच्या एकूण २००० रिक्त जागा भरण्यास सुरुवात झाली आहे . एसबीआय PO पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा लागेल . पदांसाठीची पात्रता, वयोमर्यादा, वेतन आणि इतर तपशील जाणून घेऊया..
SBI PO Recruitment 2023: बँकिंग ची तयारी करणाऱ्यासाठी खुशखबर SBI स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये सुवर्णसंधी आहे. ‘SBI’ने प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO) पदासाठी भरती जाहीर आली असून एकूण २००० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत . या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
भरतीसंदर्भात ‘SBI’ ने अधिसूचना जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २७ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या Probationary officer पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात विभागली जाणार आहे . सुरूवातीला पूर्व परीक्षा होईल, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत होईल. पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षा देता येईल. मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यावर उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांनाच नियुक्त केले जाईल. या भरतीचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे..
या भरतीसाठीची पदे आणि पदसंख्या:
परिविक्षाधीन अधिकारी/ प्रोबेशनरी ऑफिसर
एकूण रिक्त जागा २०००
त्याची विभागणी पुढीलप्रमाणे:
जनरल: ८१० जागा
ओबीसी: ५४० जागा
ईडब्ल्यूएस: २०० जागा
एससी: ३०० जागा
एसटी: १५० जागा
एकूण : २००० जागा
वेतन श्रेणी:
६५ हजार ७८० ते ६८ हजार ५८० रूपये.
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी उमेदवार देखील अर्ज करू शकतात. मुलाखतीच्या वेळी त्यांना पदवीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी २१ ते जास्तीत जास्त ३० वर्षे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची तर एस/एसटी वर्गाला ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क:
जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी प्रवर्गासाठी ७५० रुपये तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गाला अर्ज शुल्क माफ आहे.
अर्ज पद्धती:
ऑनलाईन
अर्ज भरण्याची प्रक्रिया ७ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणार असून २७ सप्टेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
या भारतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास बँकेच्या https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या ‘करिअर’ वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
https://ibpsonline.ibps.in/sbipoaug23/ लिंकवर जाऊन तुम्ही नोंदणी करून थेट अर्ज भरू शकता.