राम मंदिराच्या उभारणीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या २२ जानेवारी रोजी या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. पण टप्प्याटप्प्यानं ट्रस्टकडून मंदिराच्या खास गोष्टी उलगडल्या जात आहेत.आज नव्यानं ट्रस्टनं नवे फोटो समोर आणले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार विशेष मुर्त्या बसवण्यात येणार आहेत.श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं ट्विट करत हे नवे फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये हत्ती, सिंह, हनुमान, गरुड पक्षी या चार मुर्त्यांचा समावेश आहे. या चारही मुर्त्या राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आल्या आहेत. यांची खास वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून या मुर्त्या साकारण्यात आल्या असून राजस्थानमधील बन्सी पहारपूर गावातील कारागिरांनी त्या घडवल्या आहेतप्रवेशद्वारावर बसवण्यात येणार मूर्तीयामध्ये हत्ती, सिंह, हनुमान, गरुड हे चारही प्राणी शक्तीचे प्रतिक आहेत. त्यामुळं मंदिरात प्रवेश करताना भाविकांना शक्तीचं दर्शन व्हावं यासाठी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच्या पायऱ्यांच्या बाजूला या मुर्त्या बसवण्यात येणार आहेत.२२ जानेवारीला होणार प्रतिष्ठापनादरम्यान, २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. देशभरात या सोहळ्याचं वातावरण तयार केलं जात आहे. यासाठी काही निवडक लोकांना निमंत्रित करण्यात आलं आहे. याची इंग्रजी भाषेतील विशेष निमंत्रण पत्रिका देखील समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन होणार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे
गरुड
हनुमान
सिंह