Suryodaya solar rooftop scheme भाराताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे नेहमीच नागरिकांना उत्तम सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने विविध योजनांची अंमलबजावणी करीत असतात. शेतकरी, सामान्य नागरिक आणि गरिब जनता यांच्यासाठी नेहमीच मोदीजी विविध योजना आखत असतात त्यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सुर्योदय योजना 2024. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान सूर्योदय योजना जाहीर केली. ही योजना नेमकी आहे तरी काय, आणि या योजनेचा कोणा कोणाला लाभ होणार आहे या सर्व गोष्टी आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. PradhanMantri Suryoday Yojana 2024 in Marathi
प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 नेमकी आहे तरी काय हे जाणून घेऊ?
भारत हा असा देश आहे जेथे दिवसाचे 15 ते 16 तास सुर्याची प्रखर किरणे जमिनीवर येत असतात. या सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केल्यास भारतात वीजबिलाची समस्या दूर होऊ शकते. म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत ग्रामिण आणि शहरी भागातील 1 कोटी अल्प-मध्यम उत्पन्न असलेल्या लोकांच्या छतावर सौर पॅनेल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हे पॅनेलच्या मध्यामातुन विजनिर्मिती करण्यात येईल. सूर्यप्रकाशात चार्ज होणारे हे पॅनल लोकांच्या घरात वीज पुरवतील. यामुळे ग्रीड निर्मित विजेचा वापर कमी होईल. आणि वाढत्या बिलापासून देखील लोकांना मुक्तता मिळू शकेल. Suryodaya solar rooftop scheme 2024
प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 चे फायदे
- या योजनेद्वारे देशातील नागरिकांच्या घरांवर सौर पॅनेल बसवले जाणार आहेत. जेणेकरुन त्यांचा वीज बिलाचा खर्च कमी करता येईल.
- पंतप्रधान सूर्यदय योजनेचा थेट फायदा देशातील गरीब आणि मध्यमवर्गाला होणार आहे.
- प्रधानमंत्री सुर्योदय योजना वीजबिल कमी करण्यासाठी आणि वीज कपातीची समस्या असलेल्या भागात अत्यंत प्रभावी ठरेल.
- या योजनेचा लाभ घेतल्यास जनसामान्य नागरिकांना वीज बिलाच्या खर्चातून सवलत मिळणार आहे. त्याने त्यांचे आर्थिक नुकसान टाळेल आणि आर्थिक बचत होईल.
- शेतकऱ्यांना आणि जनसामान्यांना जेव्हा वीजपुरवठा खंडीत होतो तेव्हा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, आता या समस्येपासून आराम मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत तयार होणारी सौरऊर्जा वीज ही नागरिक 8 रु.दरदिवशी या प्रमाणे 25 वर्षांसाठी वापरु शकणार आहेत. Suryodaya solar rooftop scheme 2024
भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 3Kw क्षमतेच्या प्लांटसाठी प्रकल्पाची किंमत सुमारे 1.26 लाख रुपये आहे. त्यापैकी सरकार 54 हजार रुपये अनुदान देणार आहे. म्हणजेच हा प्लांट उभारण्यासाठी तुम्हाला फक्त 72 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. हे प्लांट नागरिकांना पुढील 25 ते 30 वर्षे वापरता येऊ शकतात. म्हणजे एकदाच 72 खर्च करुन नागरिक पुढील 25 ते 30 वर्षे विज बिलाच्या अतिरिक्त त्रासापासून मुक्त होणार आहेत. इतकेच काय तर सोलर पॅनल बसवून घेतल्यानंतर दररोज वारपण्यात येणाऱ्या विजेचा खर्च केवळ आणि केवळ 8 रु. इतका असणार आहे. हा खर्चा पुढील 25 वर्षे विजेचा वापर नागरिकांना करता येणार आहे. Suryodaya solar rooftop scheme 2024
प्रधानमंत्री सुर्योदय योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत तुमच्या घरात सौर पॅनेल बसविण्यासाठी तुम्हाला पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- शिधापत्रिका
- वीज बिल
- मोबाईल नंबर
- बँक तपशील
- पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री सुर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या https://solarrooftop.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागले.
- त्यानंतर वेबसाईटच्या मुख्य पानावर Apply हा पर्याय निवडा.
- तुमचे राज्य / जिल्हा निवडा आणि त्यापुढे विचारण्यात आलेली माहिती भरा
- यानंतर तुम्ही तुमचा सध्याचा वीज बिल क्रमांक भरा.
- वीज खर्चाची माहिती आणि मूलभूत माहिती भरल्यानंतर, सौर पॅनेल तपशील भरा
- त्यानंतर तुमच्या छताचे क्षेत्रफळ मोजा आणि भरा.
- तुमच्या छताच्या क्षेत्रफळानुसार सोलर पॅनेल लावावे लागणार असल्याने त्याचे माप तुम्हाला अर्जात सबमिट करणे आवश्यक आहे.
अर्ज पूर्ण केल्यानंतर, सरकार या योजनेअंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करेल.