Personal loan for low CIBIL Score 550 आर्थिक अडचण काही सांगून येत नाही. कधी कोणाला दवाखान्यासाठी पैसे लागू शकतात, कधी शिक्षणासाठी तर कधी व्यवसायासाठी पैशांची गरज भासू शकते. अशावेळी आर्थिक गरज भागली नाही तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. कधी कधी जिवित हानी देखील होते, कारण हॉस्पिटल्समध्ये देखील हल्ली पैसे भरल्याशिवाय पेशंटला दाखल करुन घेतले जात नाही. मग आपल्याकडे पर्सनल लोन हा एकमेव पर्याय उरतो. Personal loan for low CIBIL Score 550
हल्ली कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असले तरी आपली आर्थिक हिस्ट्री चेक केली जाते. ही आर्थिक हिस्ट्री म्हणजे आपला Cibil Score असतो. CIBIL म्हणजेच Credit Information Bureau India Limited, कोणतीही बँक किंवा वित्तिय संस्था कर्ज देताना Cibil Score तपासतात. हा स्कोअर 700 ते 900 यामध्ये असेल तर त को चांगले सिबिल स्कोअर समजला जातो. आणि 400 ते 500 दरम्याने असेल तर अत्यंत वाईट सिबिल स्कोअर आहे असे म्हटले जाते. आणि ज्यांचा सिबिल स्कोअर चांगला नसतो त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळवताना अत्यंत अडचणी येऊ शकतात. बरेचदा कर्ज मिळत देखील नाही. परंतु अशा काही वित्तिय संस्था आणि मोबाईल ऍप्स आहेत ज्यांच्या मदतीने आपण कमी Cibil Score असला तरीही तुम्हाला कर्ज मिळू शकेल. Personal loan for low CIBIL Score 550
वित्तीय कंपन्या कमी सिबिल स्कोअर असलेल्यांना कर्ज देतात
काही वित्तित संस्था देखील सध्या नागरिकांना वैयक्तिक कर्ज देत आहेत. कमी Cibil Score असला तरीही या वित्तिय संस्था नागरिकांना कर्ज उपलब्ध करुन देतात. त्यांची अट असते की ज्यांना कर्ज हवे आहे त्यांना त्यांच्या बँकेत खातेदारक व्हावे. तसेच त्यांच्या बँकेतूनच कर्जदारांनी त्यांचे इतर आर्थिक व्यवहार करावेत. ज्यांना पैशांची आवश्यकता आहे, आणि instant loan हवे आहे त्यांनी या वित्तिय बँकांचे ग्राहक व्हावे. आणि त्यांच्या सेवा योजनांचा लाभे घ्यावा. या अशा बँकांपैकी काही बँका म्हणजे, कोटक महिंद्र बँक, पंजाब नॅशनल बँक या बँका तुम्हाला पर्सनल लोन उपलब्ध करुन देतात परंतू ज्यांना हे कर्ज हवे आहे त्यांना आधी या बँकांचे ग्राहक होणे आवश्यक असते. Personal loan for low CIBIL Score 550
काही मोबाईल ऍप्सच्या मदतीने तुम्ही कर्ज मिळवू शकता
सध्या पर्सनल लोन देणारे अनेक मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. उदा. Money view app, True balance app यासारखे मोबाईल ऍप अगदी कमी कागदपत्रांमध्ये तुम्हाला पर्सनल लोन उपलब्ध करुन देतात. हे ऍप्स तुमचा Cibil Score कमी असला तरीही तुम्हाला लोन उपलब्ध करुन देतात, फक्त या ऍप्सचे पर्सनल लोनवरील व्याज जास्त असते. ते व्याज तुम्हाला वेळीच भरावे लागते. तसेच या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा 12 ते 18 महिन्यांचा असतो. या वेळेत कर्जदाराने घेतलेले पैसे भरणे अपेक्षित असते.
low cibil score कर्जासाठी आवश्यक पात्रता
- कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार भारताचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- कर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
- मासिक उत्पन्नाचा निश्चित मार्ग असणे आवश्यक आहे.
- मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
- अर्जावर नमूद केलेल्या इतर अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे.
low cibil score instant loan कर्जासाठी कागदपत्रांची आवश्यकता
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मागील 6 महिन्यांचे तुमचे बँक स्टेटमेंट Personal loan for low CIBIL Score 550
अशा पद्धतीने तुम्हा कमी cibil score असूनही आर्थिक अडचणीच्या वेळी Personal loan मिळवू शकता. आणि तुम्हाला कधीच अशा प्रकारचे लोन काढण्याची गरज भासू नये असे वाटत असल्यास तुम्ही तुमच्या गरजा कमी ठेवणे देखील अपेक्षित असते. तसेच तुमचे रोजचे राहणीमान आरोग्यमय असावे, व्यायाम, घरचे जेवण, पोषक आहार या माध्यमातून तुम्ही आरोग्यदायी राहू शकता. जेणेकरुन हॉस्पिटल्सला कधी पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि तुम्हाला कर्ज घेण्याची वेळ येणार नाही.