Railway Recruitment 2024 भारतीय रेल्वे ही भारतातील सर्व राज्यांना जोडणारे जाळे आहे तसेच राज्यांतर्गत शहरांना देखील जोडणारे एक लोकल जाळे भारतीय रेल्वे अतंर्गत कार्यरत आहे. त्यामुळे संपुर्ण भारतात पसरलेल्या या विभागांतर्गत विविध जागांसाठी भरती सुरुच असते. आता टेक्निशिअन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे आणि तब्बल 9144 जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवाराची भरती झाल्यानंतर भारतातील कोणत्याही राज्यात नोकरीनिमित्त राहण्यास जावे लागेल. तरी तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये काम करु इच्छीत असाल तर सरळसेवा पद्धतीने निवड होण्याच्या या पद्धतीचा लाभ घ्या आणि ही नोकरी मिळवा. या लेखाच्या माध्यमातून रेल्वे भरतीसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला अर्ज करताना अडचण येणार नाही. Railway Recruitment2024
कोणकोणत्या पदांतर्गत भरती
- टेक्निशियन – Technician Grade -I Signal – या पदांतर्गत 1092 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे
- टेक्निशियन Technician Grade -III –या पदांतर्गत 8052 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवाराची आवश्यक शैक्षणिक आर्हता
- रेल्वे भरतीअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या टेक्निशियन – Technician Grade -I Signal या पदासाठी बी.एस्सी / बी.टेक / डीप्लोमा इन फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / आयटी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. Railway Recruitment2024
- रेल्वे भरतीअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या टेक्निशियन Technician Grade -III सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण किंवा 12 वी विज्ञान शाखेतुन PCM विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा काय आहे?
रेल्वे भरतीअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या टेक्निशियन – Technician Grade -I Signal आणि टेक्निशियन Technician Grade -III सदर पदांकरीता अर्ज करु इच्छिणाऱ्यांची वयोमर्यादा दिनांक 1 जुलै 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे. Railway Recruitment2024
वेतन किती असेल
- टेक्निशियन ग्रेड I सिग्नल या पदाची 5 वी लेवल असून 29,200/- इतके वेतन मिळेल
- टेक्निशियन ग्रेड III या पदाची 2 री लेवल असून 19,900/- इतके वेतन मिळेल
रेल्वे भरती अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
- रेल्वे भरतीअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या टेक्निशियन – Technician Grade -I Signal आणि टेक्निशियन Technician Grade -III सदर पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून इच्छूक अर्जदारांनी https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing या लिंकवर क्लिक करायचे आहे.
परीक्षा शुल्क किती असेल?
रेल्वे भरतीअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या टेक्निशियन – Technician Grade -I Signal आणि टेक्निशियन Technician Grade -III या दोन्हीपैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करणार असाल आणि तुम्ही खुल्या किंवा ओबीसी प्रवर्गातील असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्जाची फी 500/- रुपये इतकी भरावी लागेल
आणि तुम्ही मागास प्रवर्गातील किंवा माजी सैनिक, महिला, आ.दु.घ प्रवर्गातील असाल तर तुम्हाला 250/- रुपये इतके परीक्षा शुल्क भरावे लागेल. Railway Recruitment2024
अर्ज करण्याची अंतीम तारीख
भारतीय रेल्वे विभागामार्फत टेक्निशिअन पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या भरती प्रक्रीयेसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 8 एप्रिल 2024 आहे.
भारतीय रेल्वेअंतर्गत तुम्हा नोकरी करु इच्छित असाल तर या संधीचा फायदा घ्या. कारण ही सरळसेवा पद्धतीत भरती केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शैक्षणिक आर्हता तपासा. तुम्ही शैक्षणिक आर्हतेत बसत असाल तर आजच या भरती अंतर्गत अर्ज करा. जेणेकरुन नोकरी नंतर तुम्हाला भारतात कोणत्याही राज्यात नोकरी करण्याची संधी मिळू शकेल. तसेच रेल्वे भरतीअंतर्गत तुमची निवड झाल्यास जीवनभर तुम्हाला आणि तुमच्या आई वडील बायको मुलांना संपुर्ण भारतभर रेल्वे प्रवास मोफत होणार आहे. Railway Recruitment2024