Central Bank of India Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया बॅंकेत निघाली ‘या’ जागांसाठी भरती, दरमहा मिळेल 26,500 रुपये पगार…

Central Bank of India Recruitment: सध्या विविध विभागामार्फत नोकर भरती राबविण्यात येत आहे. त्यामुळे विविध परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास संधी मिळत आहे. प्रत्येक क्षेत्रात नोकरभरती निघत आहे. आता बॅंकिंग क्षेत्रात देखील जॉबची सुवर्णसंधी आलेली आहे. तुम्हीही सरकारी बॅंकेमध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला महत्वाची माहिती सांगणार आहोत. 

राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पोलिस भरती देखील राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या देखील विविध विभागाच्या जागा निघत आहे.

याचप्रमाणे जे विद्यार्थी बॅंकिंग क्षेत्रात जाण्यासाठी इच्छुक आहे, त्यांच्यासाठी देखील जागा निघालेल्या आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) बॅंकेमध्ये नोकर भरतीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी बंपर भरती निघालेली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सुपरवाइजर (Supervisor) या पदांसाठी भरती निघालेली आहे. याबाबतची जाहिरात देखील काढण्यात आली आहे. जे पात्र उमेदवार असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत असून लवकरच भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Central Bank of India Recruitment 2024
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सुपरवाइजर पदाच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी ही नोकर भरती निघालेली असून, जे उमेदवार या पदाकरीता इच्छुक आणि पात्र असतील त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले असून ज्या उमेदवारांना सुपरवाइजर या पदाकरिता अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

Bank Recruitment 2024 किती पगार मिळणार ?
सेंट्रल बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही भरती प्रामुख्याने सुपरवाइजर या पदाच्या रिक्त जागा भरण्याकरिता घेण्यात येत आहे. या भरती मध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला 26,500 रुपये प्रति महिना पगार मिळेल.‌ पुढे हा पगार वाढत जाईल. cbi recruitment 2024

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
1) या भरतीसाठी उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं गरजेचं आहे.
2) तसेच संगणकाचे ज्ञान असणं आवश्यक आहे.
3) एम एस वर्ड (MS Word), ई-मेल (Email) आणि इंटरनेट याबाबत माहिती असणं देखील आवश्यक आहे.
4) तसेच एमएससी (MSC) आणि बीसीए (BCA) पदवीधर देखील या पदासाठी अर्ज करू शकतात.
5) भरतीच्या अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया भरतीच्या निवड प्रक्रिया कशी असणार ?
सेंट्रल बँकेमध्ये सुपरवाइजर या पदाचे रिक्त जागा भरण्यासाठी इंटरव्ह्यू (Interview) घेऊन निवड केली जाणार आहे. यासाठी कोणतीही परिक्षा घेतली जाणार नाही. इंटरव्ह्यू देऊन तुम्ही सरळ तुमची निवड केली जाईल. अशाप्रकारे या भरतीची निवड प्रक्रिया आहे.

भरती करिता वयाची अट
या नोकर भरती करिता वयाची अट ही किमान 21 ते कमाल 35 वर्ष असणं गरजेचं आहे. तसेच सरकारी नियमांनुसार कास्ट नुसार वयाची अट देखील देण्यात आलेली आहे, यासाठी अधिकृत जाहिरात वाचावी. Central Bank of India Bharti

अर्ज करण्याची शेवटची तारीख
भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. यापूर्वी अर्ज सादर करणं गरजेचं आहे. मुदतवाढ मिळेल का नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करावा. अर्ज कसा करायचा हे देखील सांगण्यात आले आहे. (central bank of india supervisor recruitment)

अर्ज कसा करायचा ?
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील ते अर्ज करू शकतात. यासाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर कसा करायचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या.

1) सर्वप्रथम सेंट्रल बँकेच्या वेबसाईटवर जा.
2) यानंतर, रिक्रूटमेंट (Recruitment) या पर्यायावर क्लिक करा.
3) येथून नोटीफिकेशन म्हणजेच भरतीची जाहिरात डाऊनलोड करा
4) संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप चेक करा.
5) अर्ज करण्यासाठी फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
6) अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा व जी कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे जोडा.
7) अशाप्रकारे तुम्ही ऑफलाईन सादर करू शकता.

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://rb.gy/9qs3cg

या भरतीच्या अधिक माहितीसाठी https://www.centralbankofindia.co.in/en/recruitments या अधिकृत वेबसाईटवर जा.

Leave a Comment