Mahavitran Bharti 2024 : महावितरण मध्ये निघाली मोठी बंपर भरती, लगेच करा अर्ज

Mahavitran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मार्फत रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघालेली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमुळे नोकरीची संधी सुवर्णसंधी चालून आली आहे. या नोकर भरतीमुळे तरुणांना दिलासा मिळणार आहे.

या भरती अंतर्गत “कनिष्ठ सहाय्यक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती काढण्यात आली आहे. ही पदे भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकवर क्लिक करून तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या नोकर भरतीची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय हवी, किती जागांसाठी भरती होणार आहे, वयाची अट काय आहे तसेच अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Mahavitran Recruitment 2024
महावितरण भरती 2024 पदाचे नाव
महावितरणाच्या प्रसिद्ध झालेल्या जाहिराती नुसार यामध्ये “कनिष्ठ सहाय्यक” या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

किती जागा रिक्त आहेत ?
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदाच्या 468 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. (MSEDCL Junior Assistant Recruitment 2024)

शैक्षणिक पात्रता काय हवी ?
महावितरणच्या या भरती करिता किमान उमेदवाराचे शिक्षण हे B.com, BMS, BBA मधून पूर्ण असावे आणि सोबत MSCIT सुद्धा पूर्ण पाहिजे. ही शैक्षणिक पात्रता पूर्ण असल्यानंतरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

महावितरण भरती मध्ये वयाची अट काय आहे ?
काढण्यात आलेल्या जाहिराती नुसार, या भरती करिता 18 ते 30 वर्षें वयापर्यंत चे उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये प्रवर्गासाठी वयाची सूट देखील देण्यात आली आहे.
1) एससी/एसटी वर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे सूट
2) ओबीसी वर्गातील उमेदवार करिता 3 वर्षे सूट

या भरतीमध्ये निवड प्रक्रिया कशी असणार ?
महावितरण मधील कनिष्ठ सहाय्यक रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन एक्झाम घेण्यात येणार ही. ही परीक्षा आयबीपीएस (IBPS) पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.

पगार किती मिळणार ?
महावितरण मध्ये सुरुवातीला 3 वर्षे कंत्राटी पद्धतीने केली जातात आणि त्यानंतर उमेदवारांना पर्मनंट केले जाते. तर या वर्षें कंत्राटी पद्धती मध्ये किती पगार मिळतो, हे खाली देण्यात आले आहे.
1) पहिल्या वर्षासाठी – 19,000 रुपये महिना
2) दुसऱ्या वर्षासाठी – 20,000 रुपये महिना
3) तिसऱ्या वर्षासाठी – 21,000 रुपये महिना 

परीक्षा शुल्क किती आहे ?
महावितरण मध्ये होत असलेल्या भरती करिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी 500 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये फी आहे. mahavitaran vidyut sahayak bharti 2024

अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे का ऑफलाईन ?
अर्जाची पद्धत ऑफलाईन नसून ऑनलाईन पद्धतीने आहे. त्यामुळे खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. Mahavitaran Bharti 2024 Notification

अधिकृत वेबसाईट (Official Website)
अधिक माहिती करिता https://www.mahadiscom.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

महावितरण भरती 2024 करिता अर्ज कसा करायचा ?
1) महावितरण भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2) यासाठी https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अर्ज करायचा आहे.
3) अर्ज व्यवस्थित भरून विचारलेली कागदपत्रे अपलोड करून जी काही अर्जाची फी असेल ती पे करून अर्ज सबमिट करा.
4) अशाप्रकारे अर्ज करण्याची प्रोसेस राहील. अशा पद्धतीने तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
5) अर्ज करण्याच्या संपूर्ण सूचना http://www.mahadiscom.in/ या वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत.
6) तसेच अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून व्यवस्थित ठेवा.

Leave a Comment