sim card checks online: तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत चेक करा; तुमच्या नकळत दुसरे कोणी तुमचे सिम कार्ड वापरत तर नाही ना, हे तपासा

आज आपण पाहू शकतो बाजारात अनेक विविध कंपन्या उपलब्ध आहेत ज्या मोबाईल नेटवर्क उपलब्ध करुन देतात. अशा परिस्थितीत त्या त्या कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क वापरण्यासाठी आपण आपल्याला हव्या असलेल्या नंबरचे सिम कार्ड खरेदी करतो. काही लोक तर एकावेळी चार चार विविध कंपन्यांचे सिम कार्ड खरेदी करतात आणि विविध मोबाईल नंबरचा वापर करीत असतात. यासाठी मोबाईल कंपन्यांनी देखील ड्युअल सिमचे मोबाईल फोन बाजारात आणले आहेत ज्याच्या मदतीने एकाच मोबाईलमध्ये आपण दोन सिम कार्ड म्हणजेच दोन मोबाईल नंबरचा वापर करु शकतो. 

एकाच वेळी अनेक सिम कार्ड वापरताना काळजी घ्या

भारतात विविध सिम कार्ड कंपन्या ग्राहकांना ऑफर्स देत असत आणि ग्राहक देखील मोफत टॉकटाईम मिळत असल्याने दोन दोन सिम खरेदी करीत असत. अशावेळी दुसऱ्याच्या ओळखपत्राचा वापर करुन बनावट आयडीचा वापर करून सिम नंबरवरून गुन्हे घडवले जात असत.  इतकेच नाही तर एकाच्या नावावर असणारे सिम कार्ड दुसरा कोणीतरी वापरत असल्याचे प्रकार गुन्हा शाखेच्या पोलीसांच्या समोर आले आहेत. SIM Card Check Online

तुमच्या नावावर कोणी सिमकार्ड वापरत असेल तर जाणून घ्या!

तुमच्या ओळखपत्रावर  एखादे सिम अ‍ॅक्टिव्हेट केलेले असेल जे तुम्ही वापरत नसाल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्या आयडीवर नोंदणीकृत सिमसोबत चुकीच्या किंवा बेकायदेशीर हालचाली सुरू असतील, तर तुम्ही अडचणीत याल.म्हणून आजच  तुमच्या  ओळखपत्रावर  किती सिम कार्ड नोंदणीकृत केलेले आहेत हे जाणून घ्या, सतर्क रहा. SIM Card Check Online

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ते पहा.

तुमच्या नावावर कोणी सिम कार्ड वापरत असेल तर पुढील प्रक्रिया करुन तुम्ही ते शोधून काढू शकता. आणि तुम्ही वापरत नसलेला मोबाईल नंबर डिऍक्टिवेट करु शकता. जेणेकरुन तुमच्या नावावर दुसरी कोणी व्यक्ती गैरवापर करु शकणार नाही.

  • सर्वप्रथम तुम्हाला https://www.sancharsaathi.gov.in/ ही लिंक ओपन करावी लागेल.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर भरा आणि खाली देण्यात आलेला  कॅप्च्या अचूक भरा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर  OTP येण्यासाठी रिक्वेस्ट करा,  मग तुमच्या मोबाईलवर OTP येईल.
  • समोर आलेल्या रकान्यात OTP भरा आणि validate ऑप्शनवर क्लिक करा.
  • स्क्रिनवर तुम्हाला तुम्ही जोडलेल्या आयडी प्रूफचा फोटो आणि ऍक्टिव्ह असलेले मोबाईल नंबर दिसतील.
  • समोर मोबाईल नंबरच्या दिसत असलेल्या यादीमध्ये तुम्ही वापरत असलेले नंबर ठेवून बाकीचे नंबर डिऍक्टिवेट किंवा डिलिट करा म्हणजे इतर कोणी ते नंबर वापरत असतील तर ते बंद होतील.

फ्रॉड सिमकार्ड वापरून होत आहेत पैशांचे गैरव्यवहार

दुसऱ्या व्यक्तीच्या ओळखपत्रावर सीम कार्ड खरेदी करुन पैशांचा गैरव्यवहार करणाऱ्या अनेक टोळ्या सध्या कार्यरत आहेत. शहरी आणि ग्रामिण  भागातील अनेकांनी या टोळ्यांनी फसवले आहे आणि लाखो रुपयांचा फ्रॉड केला आहे. या अशा गोष्टींना आळा बसावा म्हणून आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. तुम्ही वरील प्रक्रिया करुन आजत तुमच्या ओळख पत्रावर किती मोबाईल नंबर ऍक्टिवेट आहेत हे तपासून घ्या, तुम्ही वापरत नसलेले मोबाईल नंबर डिऍक्टिवेट करा जेणेकरुन दुसरी कोणी व्यक्ती तुमच्या नावावर फ्रॉड करु शकणार नाही. SIM Card Check Online

एकावेळी दोन पेक्षा जास्त सिम कार्ड वापरत असाल तर

आपल्या आधारकार्डला लिंक असेलला मोबाईल क्रमांक हरवू नका. असे झाल्यास तुम्हाला  तुमचे ऑथेंटिफिकेशन करता येणार नाही. तुम्ही जर का एकावेळी दोन पेक्षा जास्त सिमकार्ड वापरत असाल आणि तुमच्या पॅनकार्ड किंवा आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याकडून हरवला किंवा नकळत तुम्ही तो नंबर बंद केला तर तुम्हाला आधारकार्ड वापरा बाबत OTP मिळविणे कठीण होईल इतकेच नाही तर तुम्ही कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. कारण शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधारकार्ड ज्या मोबाईल क्रमांकाशी लिंक आहे तो मोबाईल क्रमांक तुमच्याकडे ऍक्टिवेट असणे आणि वापरात असणे अत्यंत गरजेचे असते. SIM Card Check Online

Leave a Comment