
Free invitation cards making in marathi: आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण, समारंभ, आणि कौटुंबिक कार्यक्रमाला एक वेगळंच स्थान आहे. लग्न, वाढदिवस, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, सत्यनारायण पूजन, मुंज, अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात येतात आणि त्या आपल्या आठवणींचा अविभाज्य भाग होतात आणि या प्रत्येक क्षणाच वैशिष्ट्य म्हणजे आपली खास निमंत्रणपत्रिका.
मात्र सध्याच्या काळात डिजिटायझेशनमुळे अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. छापील पत्रिकांच्या तुलनेत डिजिटल निमंत्रणपत्रिका सहज, सोप्या आणि पर्यावरणपूरक ठरत आहेत. पण अनेक वेळा आपल्याला वाटतं की डिजिटल डिझायनरकडे जाऊन पत्रिका बनवून घेण्यासाठी चांगली रक्कम मोजावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन आम्ही अशा काही वेबसाईट्स आणि ऍप्सची माहिती आज इथे देत आहोत, ज्या तुमच्या कोणत्याही खास प्रसंगासाठी मराठीत डिजिटल निमंत्रणपत्रिका अगदी मोफत तयार करून देतील.
निमंत्रणपत्रिका कुठल्या कार्यक्रमासाठी लागतात?
आपल्या घरात वर्षभर विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होत असतात. जसे की,
- लग्न आणि साखरपुडा
- हळदीची पूजा
- वास्तुशांती आणि गृहप्रवेश
- मुलाचे जावळ किंवा मुंज
- नवजात बालकाचं नामकरण
- ओटभरण
- सत्यनारायण पूजा
- वाढदिवस
या प्रत्येकासाठी खास निमंत्रणपत्रिका तयार करणं आवश्यक असतं, कारण तीच तर पाहुण्यांना आपल्या आनंदात सहभागी करण्याची पहिली पायरी असते. चला तर मग पाहूया असे कोणते कोणती ऍप्स आणि वेबसाईट्स आहेत ज्या तुमच्या भरपूर उपयोगी पडतील.
1. Canva, तुमचं स्वतःचा डिझायनिंग स्टुडिओ
www.canva.com या लिंकवर क्लिक करून तुम्ही Canva या वेबसाईटवर जाऊ शकता. येथे तुम्हाला लग्न, वाढदिवस, हळदीचा समारंभ अशा विविध निमंत्रणपत्रिकांचे तयार नमुने मिळतील. Canva वर काही डिझाईन्स फ्री असतात आणि काहीसाठी पैसे मोजावे लागतात. ही वेबसाईट वापरणं अगदी सोपं असून याचं मोबाईल अॅपही उपलब्ध आहे.
2. Greetings Island, आकर्षक इंग्रजी डिझाईन्ससाठी
www.greetingsisland.com ही वेबसाईट इंग्रजीत कार्यरत असली तरी वेगवेगळ्या प्रकारच्या निमंत्रणपत्रिका यावर तुम्ही तयार करू शकता. यात साखरपुडा, रिंग सेरेमनी, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी अनेक टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत. काही मोफत असून काही प्रीमियम स्वरूपात सुध्दा आहेत. मराठीतून मजकूर लिहून देखील यावर तुम्ही सुंदर डिजीटल कार्ड तयार करू शकता.
3. Paperless Post, प्रीमियम लुक असलेली डिजिटल निमंत्रणपत्रिका
www.paperlesspost.com या वेबसाईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या समारंभासाठी क्लासिक डिझाईन्स सापडतील. काही पत्रिका मोफत असून काहीसाठी पैसे मोजावे लागतात. ह्याची एक खास गोष्टी म्हणजे हे डिजाईन तुमच्या पत्रिकेला एक प्रोफेशनल टच देते.
आज अनेक मराठी कुटुंबं डिजिटल निमंत्रणपत्रिकेचा पर्याय स्वीकारत आहेत. कारण ती वेळ, पैसे आणि कागद, तिन्हींची बचत करते. वर दिलेल्या प्रत्येक ऍप किंवा वेबसाईटवर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मराठीतून तुमच्या कार्यक्रमासाठी खास निमंत्रणपत्रिका तयार करू शकता. आणि ती व्हॉट्सअॅप, मेल किंवा सोशल मिडियावर शेअरही करू शकता.
तर आता पुढच्या वेळी कार्यक्रमाचा बेत ठरला की, खिशाला ताण न देता तुमचं खास डिजिटल निमंत्रणपत्र स्वतः तयार करा, तेही अगदी मोफत.